नवीन लेखन...

माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात

ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या. […]

जागतिक मुकाभिनय दिवस

मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. […]

‘ट्वीटर’ चा वाढदिवस

२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्‍‌र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले. […]

बिहार दिन

स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता. […]

ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जाईल

पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. […]

जागतिक कठपुतळी दिवस

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात. […]

आंतरराष्ट्रीय रंग दिवस

१ मार्च ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जातो व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. आजचा दिवस व रात्र समान असतो. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र आहे. […]

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी रद्द केली

१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली. […]

वसंतोत्सव

२१ जून हा कर्क संक्रमणाचा दिवस खगोलशास्त्राप्रमाणं उन्हाळ्याची, उत्तर गोलार्धातली सुरवात मानण्यात येते. आज २१ मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटांनी सूर्य खगोलीय विषववृत्तावर येईल. यालाच “वसंत संपात” (इंग्रजीत March equinox,spring equinox, किंवा Vernal equinox) असे म्हणतात. त्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. २३.५° उत्तर अक्षांशापर्यंत जाऊन दि. २१ जूनला त्याचा परत दक्षिणेकडील […]

पारसी समाजाचे नववर्ष नवरोज

ग्रेगरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला. […]

1 16 17 18 19 20 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..