नवीन लेखन...

जागतिक मुकाभिनय दिवस

मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. पण चव थोडीजरी बिघडलेली असेल तर आपण वसकन अंगावर धावून जातो. आणि मग नवरा बायकोतला संवाद बिघडतो. असे आपण प्रत्येक क्षणी संवाद साधण्याच्या प्रतीक्षेत असतो. पण संवाद साधण्यासाठी आधी तो कुणा कडून तरी व्यक्त व्हावा लागतो.

वर्ल्ड माईम डे हा जागतिक माईम ऑर्गनायझेशनचा एक जागतिक उपक्रम आहे. आर्ट ऑफ माईम साजरी करण्यासाठी २२ मार्च तारीख निवडण्याचे कारण म्हणजे प्रसिध्द फ्रेंच माईम कलाकार मार्सेल मार्सेऊ यांचा जन्मदिवस आहे. २०११ पासून हा दिवस जगातील चारही खंडात साजरा केला जात आहे. मात्र दक्षिण अमेरिका आणि इतर देशात मार्सेल यांचा स्मृतिदिन २२ सप्टेंबर हा माइम डे म्हणून साजरा होतो. मात्र याला अजूनही युनेस्कोची मान्यता मिळालेली नाही.

१९९८ मध्ये पॅरिस येथे मार्सेल यांच्या माइम स्कूलमध्ये त्यांचे मित्र व सहकारी मार्को स्टेझानोव्हिक यांनी आयोजित केलेल्या या लहान दौर्यातसाठी इस्त्राइलचे माइम कलाकार ओफर ब्लम आले होते. ब्लम आणि स्टेझानोव्हिक यांच्या प्राथमिक चर्चेतून आर्ट ऑफ माइमला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी व प्रोत्साहन मिळण्यासाठी जागतिक माइम डे साजरा करण्याचे ठरले. पण तारीख ठरत नव्हती. २०११ पर्यंत ही सूचलेली कल्पना तशीच राहिली. २००४ मध्ये वर्ल्ड माइम ऑर्गनायझेशनची सर्बियामध्ये स्थापना करण्यात आली. कारण संस्था स्थापनेची सर्वात कमी कागदपत्र सर्बियामध्ये लागत असत. २००७ मध्ये मार्सेल यांचे निधन झाले. एप्रिल २०११ मध्ये जीन बर्नाड लॅकलोटे यांने जागतिक माइम डे व जर्नी मॅन्यूअल डू माईमची एक विकसित कल्पना स्टेझोनोव्हिकला इमेल केली. त्यावेळेस ब्लूम व स्टेझोनोव्हिक यांना जागतिक माइम डेवरील चर्चा आठवली. आर्ट ऑफ माइममधील सर्वात मोठी व्यक्तीा समजला जाणारा आपला मित्र मार्सेलच्या नावाला अजरामर करण्यासाठी २२ मार्च ही या दिवसाची तारीख त्यांनी ठरवली.

माइम म्हणजे काय?

आपल्या मनातील भावना हाताची हालचाल आणि देहबोलीतून मूकपणे सादर करणे म्हणजे मायमिंग. अंधारात कलाकाराची कला स्पष्ट दिसावी यासाठी डोक्यापासून पायापर्यंत पांढऱ्या शुभ्र कापडात शरीर लपेटून चेहऱ्यावरील अवयव काळ्या आणि लाल रंगाने रंगवून हायलाइट केले जातात.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..