नवीन लेखन...

जागतिक क्षयरोग दिन

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. २४ मार्च १८८२ रोजी डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी.

ट्युबरक्युलोसिस म्हणजे (क्षयरोग) हा संसर्गजन्य आजार असून , तो ‘मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस’ या जंतूमुळे होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अस्वच्छ परिसर , दाटीवाटीने वाढणार्या झोपड्या व जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगी आढळतात. त्यामुळे क्षयरोगाचे गांभिर्य अधिक आहे.

क्षयरोगाबद्दलच्या गोष्टी

• क्षयरोगाच्या जंतूचा फुफ्फुसात संसर्ग होतो –
शिंकल्यावर , खोकल्यावर क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात. या हवेत श्वास घेत असलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे जंतू जातात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत कमी असल्यास किंवा जंतूंचा जोरदार हल्ला झाल्यास व्यक्तीला टीबी होण्याची शक्यता असते.सुरूवातीच्या काळात हा फुफ्फुसात आढळतो. मात्र त्याची तीव्रता वाढल्यास टीबी फुप्फसापुरता मर्यादित न राहता तो शरीरात सांधे, मणका, मेंदू अशा फुप्फुसाव्यतिरिक्त शरीरातील इतर भागात देखील पसरू शकतो. ज्याला एक्स्ट्रापलमनरी टीबी म्हणतात.

• चांगले आरोग्य व उत्तम रोगप्रतिकारशक्तीने क्षयरोगापासून बचाव होऊ शकतो –
पोषक आहार , पुरेशी झोप , कमीत कमी तणावग्रस्त जीवनशैली आत्मसात केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास व संसर्गाचा सामना करण्यास मदत होते. आहारात अॅ न्टीऑक्सिडंट पदार्थांचा ,भाज्यांचा समावेश वाढवा व रोगप्रतिकार शक्ती वाढवा. नियमित 4 – 5 ताज्या भाज्या व फळांचे सेवन करा. ते शक्य नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटामिन्स व ॲ‍न्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणार्याय गोळ्यांचे सेवन करा. अॅसन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडिकल्सची निर्मीती रोखते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे अन्य उपाय पाहण्यासाठी क्लिक करा – कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?

• ताजी हवा व कोवळी सुर्यकिरणं क्षयरोगाचा प्रतिबंध करु शकतात –
क्षयरोगाचे जंतू थंड व दमट परिसरात जोमाने वाढतात. दिवसा घराच्या, कार्यालयाच्या खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे मोकळी व खेळती हवा तुमच्या आसपास राहील व जंतू दूर राहण्यास मदत होईल.

• सुरूवातीच्या टप्प्यात फुफ्फुसात संसर्ग करणारा टीबीचा जंतू कालांतराने इतर अवयवांमध्येही पसरू शकतो
तीन आठवड्यांहून अधिक काळ राहणारा खोकला, सौम्य स्वरुपाचा ताप , वजन कमी होणे, भूक मंदावणे , थुंकीतून रक्त पडणे ही सामान्य क्षयरोगाची लक्षणं आहेत. मात्र हाच क्षयरोग त्वचेत पसरल्यास भरून न येणारा अल्सर ,पाठीच्या कण्यांतील क्षयरोग असल्यास पाठदुखी, सूज येणे किंवा ताठरता राहणे अशी लक्षणे आढळून येतात. तर हाच क्षयरोग आतड्यांमध्ये गेल्यास बद्धकोष्ठ्तेची समस्या , ओटीपोटात ताण येण्याचे प्रमाण वाढते . तर मेंदूच्या आवरणाचा टीबी – मेनिन्जायटीस हा लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो.

• बीसीजी लस ही क्षयरोगाचा पूर्ण प्रतिबंध करू शकत नाही.
प्रत्येक बाळाला बीसीजी लस टोचून घेणे. गरजेचे आहे पण बीसीजी लस ही क्षयरोगाचा पूर्ण प्रतिबंध करू शकत नाही. बीसीजी लस देऊनही क्षयरोग होऊ शकतो.

• क्षयरोगाच्या औषधांचे सेवन खंडीत केल्यास , त्यावर मात करणे कठीण होईल.
क्षयरोगाचे उपचार मध्येच सोडून कालांतराने क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत.परिणामी त्यावर मात करणे कठीण होते.

• मल्टी ड्रग रेझिस्टन्स टीबी , क्षयरोगाच्या सामान्य औषधांना दाद देत नाहीत, त्यावरील उपचार महाग व कठीण आहेत.
मल्टी ड्रग रेझिस्टन्स टीबीचा प्रभाव अंदाजे २.३% नवीन रुग्णात तर १२-१७% क्षयरोग उलटणार्या रुग्णात आढळून येतात. त्यामुळे यावर मात मिळवायची असल्यास, डॉक्टरांनी दिलेली क्षयरोगाची औषधं नियमित व अखंडीत घ्यावी.

• काही स्त्रियांमध्ये जननेंद्रियाचा क्षयरोग हा त्यांच्यातील वांझपणाचे एक कारण ठरू शकते.
सुरूवातीच्या काळात फुफ्फुसात असणारे क्षयरोगाचे जंतू , जेव्हा शरिरात इतरत्र पसरतात तेव्हा ते स्त्रीयांमध्ये जननेंद्रियातदेखील फैलाव करू शकतात. याचा परिणाम फेलोपियन ट्यूब किंवा गर्भाशयावर होऊ शकतो तसेच त्याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे क्षयरोगाचा संसर्ग वाढल्यास त्याचे निदान केवळ तेथील टिश्यूचे नमुने घेऊनच केले जाते.

• नवजात बालकं व लहान मुलांमध्ये देखील क्षयरोगाचा संसर्ग होतो, मात्र त्याचे योग्य वेळी निदान होत नाही.
WHO या जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार, जगभरात प्रत्येकवर्षी लाखो मुलांना क्षयरोग जडतो तर सुमारे ७०००० मुले क्षयरोगाचे बळी ठरतात. मुलांमधील कमजोर रोगप्रतिकारशक्ती व कुपोषाणाची समस्या त्यांना हा आजार जडण्याचे एक प्रमुख कारणं ठरतं आहे. म्हणूनच बालकांच्या जन्मानंतर त्यांना आवर्जून बीसीजी लस द्या. तसेच बालकांच्या जन्मानंतर सहा महिने त्यांना आईचे दूधचं द्यावे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

• क्षयरोग पुर्णपणे बरा होऊ शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी पूर्ण बरा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोगीच्या थुंकीची तपासणी व एक्स रे च्या मार्फत क्षयरोगाचे निदान करणे आवश्यक आहे. टीबीचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध नियमित घेणे गरजेचे ठरते. भारतात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रम कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक क्षेत्रात निदान व उपचार केंद प्रस्थापित केलेले आहे. तिथे क्षयरोगावरील निदान व उपचार केले जातात. त्याला डॉट प्रणाली म्हणतात. डॉट प्रोव्हायडरच्या देखरेखीखाली औषधे दिली जातात. त्याचे वेळच्यावेळी सेवन करा. वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करा व क्षयरोगावर पुर्णपणे मात करा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..