नवीन लेखन...

एअर बस ए ३८० सिंगापूर एअरलाइन्स या विमानाचे प्रथम प्रवासी उड्डाण

२७ एप्रिल २००५ रोजी प्रथम ट्रायल उड्डाण झाले होते.

एकदा इंधन भरल्यास हे विमान १५,२०० किलोमीटर प्रवास करते म्हणजे आपण आजच्या घडीला न्यूयॉर्क पासून हाँगकाँग पर्यंत न थांबता प्रवास करू शकतो .

एअरबस ए३८० हे फ्रान्समधील एअरबस ह्या कंपनीने विकसित व उत्पादित केलेले लांब पल्ल्याचे, जगातील सगळ्यात जास्त प्रवासी क्षमता असलेले दोन मजली विमान आहे. एअरबसने प्रतिस्पर्धी विमान उत्पादक बोइंगचे लांब पल्ल्याच्या विमानांवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी जून १९९४ मध्ये ह्या विमानाची घोषणा केली. १९ डिसेंबर २००० रोजी एअरबसच्या प्रशासनाने ८.८ अब्ज युरो इतक्या खर्चाचा एअरबस ए३८० विमान विकासाचा आराखडा मंजूर केला. २३ जानेवारी २००२ रोजी ह्या विमानाच्या पहिल्या सुट्या भागाचे उत्पादन सुरू झाले. पहिले विमान बांधून पूर्ण होईपर्यंत ह्या पूर्ण परियोजनेचा एकूण खर्च ११ अब्ज युरोंवर पोचला होता. अतिविशाल आकाराच्या ह्या विमानाचे सुटे भाग फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम व स्पेन ह्या देशांमध्ये बनवले जातात व तुलूझमधील प्रमुख कारखान्यामध्ये एकत्र जोडले जातात. ह्या विमानामधील अत्यंत गुंतागुंतीच्या विद्युत जोडण्या करण्यासाठी ५३० किमी लांबीच्या तारा वापरल्या जातात. एअरबसने महिन्याला ४ ए ३८० विमाने पूर्ण करण्याची क्षमता बनवली आहे.

चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एअरबस ए ३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एअरलाइन्सने २५ ऑक्टोबर २००७ सुरु केली.

‘एअरबस-३८०ची’ वैशिष्टे

* एकूण लांबी – ७२.७२ मी.

* दोन पंखांमधील रूंदी – ७९.७५ मी.

* उंची – २४.९ मी.

* प्रवासी क्षमता – किमान ५२५, कमाल ८५३

* वजन – ५६२ टन

* इंधन क्षमता – ३,२०,००० लीटर

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..