नवीन लेखन...

भुयारी रेल्वे

खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही.


    लकत्ता शहरात गेल की तिथली टयुब रेल्वे-भुयारी रेल्वे हे एक खास आकर्षण झाल आहे. युरोपातील बहुतेक सर्वच मोठया शहरात भुयारी रेल्वे आहेत. स्वित्झर्लंडमधील झुरिक या प्रमुख्य शहरात कधी भुयारी, तर कधी जमिनीवर धावणारी रेल्वे आहे. वाढत्या शहरातील वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे एकमेव साधन म्हणजे भुयारी रेल्वे. त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लाखो उपनिवासी कमी खर्चात, कमी प्रदुषणाला तोंड देत घरापासून ऑफिसपर्यंत पोचतात किंवा ऑफिसातून घरी पोचतात.

 

शहराच्या कुठल्याही भागात विनासायास पोचू शकतात. चालता चालता कुठल्याही फुटपाथवरुन, सरकत्या जिन्यावर पाय ठेवून पृथ्वीच्चा पोटात उतरु शकतात.

इंडिकेटर बघण्यासाठी माना वर कराव्या लागत नाही. प्रत्येक दहा पावलागणिक कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती गाडी येणार याचे बोर्ड लावलेले असतात आणि अखंडपणे चौवीस तास गाडयांच्या येण्या-जाण्यासंबंधीची माहिती प्रवाशांना पुरविण्यात येत असते.

हे सगळं आठवण्याच कारण म्हणजे गेले काही दिवस लोकलगाडयांच्या वेळापत्रकाची मोडतोड करण्याची स्पर्धाच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनात चालू आहे. पूर्वी पश्चिम रेल्वे बरी म्हणता यायच. आता कुणालाही बरं म्हणण्याची सोय नाही. लोक वैतागणार नाही तर काय? कशाची काहीच माहिती मिळत नाही. लोकलगाडया केव्हा आणि कशा धावतात आणि धावणार आहेत, याची माहिती ही शासनाची सर्वात जास्त गुप्त माहिती असावी, अशा पध्दतीने रेल्वे वागत असते.

गाडी रुळावरुन घसरु शकते, वीजप्रवाह खंडित होऊ शकतो, वायर तुटू शकते हे न समजण्याइतके प्रवासी अडाणी नाहीत. त्यांच म्हणण एवढच, जर गाडी चर्चगेट किंवा व्हीटीला तास-दीड तासात पोचणार नसेल तर ते आधी सांगा, म्हणजे डोंबिवली-विरार वरुन लोक गाडीत चढून चार चार तास अडकून पडणार नाहीत. पण ही साधी मागणी रेल्वेच केंद्रीय सूचना प्रसारण सुरु होऊनही पूर्ण होत नाही. व्हीटीला केलेली अनाऊन्समेंट कुठल्याही स्टेशनवरील प्रवासी ऐकू शकतात. पण काही उपयोग नाही. दगडफेकीच कुणीही समर्थन करणार नाही. पण रेल्वे अगदी अंत पाहते आणि पाच तास एका पायावर उभं राहिल्यावर गाडीसह पृथ्वी पोटात घेईल तर बरं होईल अस वाटत.

खरं पाहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही. उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही. कारण त्याकडे कुणी प्रेमाने बघतच नाही.

भुयारी रेल्वेचा विचार झाला तेव्हा खाडी बुजवून तयार झालेल शहर, रेल्वे लाइनवरच्या आजुबाजूच्या इमारती सहज कोसळतील असा तज्ञांचा अंदाज. एकंदर काय, प्रकल्प जमिनीतच गाडला गेला. कलकत्ता शहराचा प्रश्न बघता बघता सुटला. दिल्लीचाही सुटण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईत फक्त भुयारी रस्ते आहेत. खूपच वाहतूक असल्यामुळे रस्ते ओलांडण शक्य होत नाही. सिग्नलमुळे वाहतूक खोळंबते म्हणून असे भुयारी मार्ग काही ठिकाणी बांधण्यात आले आहेत. चर्चगेट स्टेशन, सायन, हाजीअली येथील सब-वे पाहिले म्हणजे अंगावर काटा येतो.

पावसाळयात प्रचंड चिकचिक. पाणी तुडुंब भरलेले असत. रस्ते गलिच्छ इतके असतात, की नाकावर रुमाल ठेवूनच चालाव लागत. केव्हा पाय घसरेल याचा नेम नाही. त्यातच हाजी आलीसारख्या ठिकाणी एकट-दुकट शिरण जरा धोक्याच. कारण आता बाहेर बोर्ड लावण्यात आला आहे. निर्धास्तपणे आत शिरा. आतमध्ये सुरक्षा रक्षक तैनात आहे. आज्ञेवरुन.

भुयारी मार्गांची ही अवस्था आहे, तर भुयारी रेल्वे समजा उद्या मुंबई शहरात आली तरतिथल्या स्टेशनची काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी. त्यापेक्षा जलवाहतुकीचा विचार करायला हरकत नाही.

-प्रकाश बाळ जोशी

आज दि. १८ ऑगस्ट १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..