नवीन लेखन...

आयुर्वेद व जडीबुटी भाग १२: हनुमान व शनीप्रिय: रुई वनस्पती (Calotropis gigantea),

आयुर्वेद व जडीबुटी भाग १२:
हनुमान व शनीप्रिय: रुई वनस्पती (Calotropis gigantea),
रुई (Calotropis gigantea), ज्याला मंदार किंवा अर्क असेही म्हणतात, ही एक विषारी औषधी वनस्पती (झुडुप) आहे. ती ॲपोसायनेसी (Apocynaceae) कुलातील आहे. रुईचे झाड किंवा झुडूप भारतात सर्वत्र आढळते, विशेषतः कोरड्या आणि ओसाड जागी. शास्त्रीय नाव – (Calotropis gigantea),

याची वेगवेगळ्या भाषेतील नावे खालील प्रमाणे:

इंग्रजी नाव: Crown flower, Gaint Milkweed crown, Madar
मराठी नाव: अकमादार/रुई
गुजराती नाव: Akado, Akad
पंजाबी नाव: Ak
तेलुगु नाव: मंदाराम, जिलेडू
पारशी नाव : खरक
अरब नाव: उशर
तमिळ नाव: एरुक्कू, पेलेरुक्कू
हिंदी नाव: अकावन, मदारा, आक
गुजराती नाव: Akado, Akad
पंजाबी नाव: Ak
तेलुगु नाव: मंदाराम, जिलेडू
पारशी नाव : खरक
अरब नाव: उशर
संस्कृत नाव: अर्का- याचा अर्थ सूर्यकिरणांचा अर्थ आहे आणि ते तीव्र, उष्ण आणि तिखट असा आहे.

या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई (Calotropis procera). जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला ‘मंदार’ असेही नाव आहे. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही. रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. रुईच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. रुई हा श्रावण नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

रुई वनस्पतीची माहिती:
एक सर्वपरिचित फुलझाड. रुई वनस्पती ॲपोसायनेसी कुलाच्या ॲस्क्लेपीएडेसी उपकुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव कॅलॉट्रॉपिस जायगँशिया आहे. ती मूळची कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, श्रीलंका, चीन व भारत या देशांतील आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे. महाराष्ट्रात पडीक पण रुक्ष जागी ती वाढलेली दिसून येते. कॅलॉट्रॉपिस प्रजातीत एकूण सहा जाती असून त्यांपैकी रुई (कॅ. जायगँशिया) आणि रुईमंदार (कॅ. प्रोसीरा) या जाती भारतात विशेषकरून आढळतात.


रुई (कॅलॉट्रॉपिस जायगँशिया) :
बहुवर्षायू झुडूप मोठे असून ते सु. ४ मी. उंच वाढते. वनस्पतीच्या सर्व भागांवर मऊ व पांढरी लव असते. तिची साल पिवळट पांढरी असून खोडावर साधी, समोरासमोर, जाड, लहान देठांची व खोडांना वेढून घेणारी पाने असतात. पाने वडाच्या पानासारखी लंबगोलाकार असून ती खुडली असता त्यांच्या देठांतून पांढरा चीक बाहेर पडतो.

 

 

 

फुले पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात. त्यांच्या कळ्या लंबगोल असतात. फुले जांभळट किंवा पांढरी आणि त्यांच्या पाकळ्या पसरट असून ती बिनवासाची असतात. फुलांत पाच पुंकेसर असून ते दलपुंजाला चिकटलेले असतात. फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा दिसणारा भाग वर आलेला असतो. हा भाग पुंकेसरांच्या देठांपासून बनलेला असतो. जायांग दोन संयुक्त अंडपींचे व ऊर्ध्वस्थ असून त्यातील बीजांडे व कुक्षीवृंत सुटे असतात. कुक्षी एकसंध व पंचकोनी असते. तिच्या कोपऱ्यावर परागकणांचे झुबके असतात. या झुबक्यांना परागपुंज म्हणतात. पेटिका फळे पिंगट, चपटी व हलकी असून त्यात अनेक लंबगोल व गुच्छरोमी (नरम तंतूंचा झुबका असलेल्या) बिया असतात. फळे तडकल्यावर बिया वाऱ्याने हवेत पसरतात.

रुई वनस्पतीचे रसायनिक घटक:
रुई (Calotropis gigantea) वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक आढळतात, ज्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत: कार्डियाक ग्लायकोसाइड्स (Cardiac glycosides): यामध्ये कॅलोट्रोपेन (calotropin), कॅलोटॉक्सिन (calotoxin), कॅलोटॉक्सिजनिन (calotoxigenin) आणि जिगांटिन (gigantin) यांचा समावेश होतो. हे घटक हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये उपयुक्त आहेत, परंतु ते विषारी देखील असू शकतात.

फ्लॅव्होनॉइड्स (Flavonoids):
रुईमध्ये कॅम्फेरोल (kaempferol), क्वेरसेटिन (quercetin), आणि रुटीन (rutin) सारखे फ्लेव्होनॉइड्स आढळतात. हे घटक अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्मांसाठी ओळखले जातात.
ट्रायटरपेनॉइड्स (Triterpenoids):

लॅटेक्स (latex) मध्ये लुपेओल (lupeol) आणि बोसवेलीक ऍसिड (boswellic acid) सारखे ट्रायटरपेनॉइड्स आढळतात, जे दाहक-विरोधी आणि वेदनाशामक (analgesic) गुणधर्म दर्शवतात.

अल्कलॉइड्स (Alkaloids):
रुईमध्ये काही प्रमाणात अल्कलॉइड्स देखील आढळतात, जे विविध आरोग्यविषयक फायद्यांसाठी ओळखले जातात.

इतर:
रुईमध्ये स्टिरॉईड्स (steroids), सॅपोनिन्स (saponins), आणि टॅनिन (tannins) देखील आढळतात.

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग:
रुईच्या मुळाची साल कडू, उष्ण, वांतिकारक, कफ बाहेर काढणारी व दाहजनक असते. पाने गरम करून पोटीस म्हणून वापरतात. चीक रेचक आहे. चीक पोटात गेल्यास जुलाब होतात व अंगाला लागल्यास दाह होऊन फोड येतात. तो कातडी कमाविण्यासाठी वापरतात. रुईची विषबाधा झाली तर चिंचेचा पाला प्रतिविष म्हणून वापरतात. बियांवरील नरम, हलके व तलम तंतू उश्या व गाद्या भरण्यासाठी वापरतात.

या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो.

• रुईच्या झाडाला येणार्‍या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस निघतो. ‘रुईचा कापूस सावरीच्या (एक प्रकारचे झाड) कापसापेक्षाही थंड असतो’, असे म्हणतात.
• रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
• रुईच्या झाडाचे आणि पानांचे खत वाळवीचा नाश करणारे आहे.
• रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १–२ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे मोकळे करावेत. हेच याचे सूत. या सुताचे दोर पाण्यात लवकर कुजत नाहीत. त्यामुळे मासे धरण्याच्या गळासाठी हे सूत वापरतात.

• रुईच्या सालीच्या आतील भागाचा कागद बनवण्यासाठी उपयोग करतात.
• सर्दी खोकला झाला, छातीत कफ जमला तर अगोदर छातीवर थोडंसं तेल लावून, वरून रुईच्या पानांनी शेकण्याने लगेच बरं वाटतं. अगदी दम्याचा अटॅकही यामुळे आटोक्यात येताना दिसतो. तान्ह्या बाळाला तर हा उपचार रामबाण आहे.
• टीप: पांढऱ्या रुईचा वापर करण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण काही लोकांमध्ये त्याच्या चिकाची ऍलर्जी होऊ शकते,
रुईच्या पानांचा उपयोग:
अनेक प्रकारे औषध म्हणून आणि इतर कामांसाठी केला जातो. रुईच्या पानांचा उपयोग मुख्यत्वे वेदनाशामक, दाहक-विरोधी, आणि जखमा भरून काढण्यासाठी होतो.
• वेदना कमी करण्यासाठी:
रुईची पाने गरम करून वेदना होत असलेल्या भागावर शेकल्याने वेदना कमी होतात.
• सूज कमी करण्यासाठी: पानांचा लेप लावल्याने सूज कमी होते.

• जखमा भरून काढण्यासाठी:
पानांचा रस किंवा लेप जखमेवर लावल्यास ती लवकर भरून येते.
• मुका मार लागल्यास:
गरम केलेल्या पानांचा शेक मुका मार लागलेल्या ठिकाणी दिल्यास आराम मिळतो.
• दमा आणि कफसाठी:
रुईच्या पानांचा रस किंवा फुले सुकवून त्यांची पूड मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
• पोटदुखी आणि अपचनासाठी:
पानांचा वापर पोटदुखी आणि अपचनासाठी केला जातो.
• त्वचेच्या समस्यांसाठी:
रुईच्या पानांचा लेप इसब (Eczema) आणि इतर त्वचेच्या समस्यांवर उपयोगी आहे.
• सांधेदुखीसाठी:
रुईच्या पानांचा गरम शेक सांधेदुखीसाठी फायदेशीर आहे, असे काही आरोग्य संकेतस्थळे सांगतात.

शेतीमध्ये:
रुईच्या पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणूनही केला जातो. रुईच्या झाडाचा उपयोग खत म्हणून केला जातो.
आँर्गेनिक स्प्रे करण्यासाठी रूई पानांचा उपयोग करतात. बेल, कडुलिंब, सिताफळ, उंबर, घाणेरी, करंजी, धोतरा इ. पानांचा अर्क + गोमूत्र रुईच्या पानांची पत्रावळ गाईचे तूप किंवा एरंड तेल लावून तव्यावर गरम करून छातीला / पाठीला बांधून ठेवणे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत करतात. हा स्वेदन वा शेकाचा एक प्रभावी उपाय आहे, कोविडमद्धे HRCT स्कोअर २०/२५ असणाऱ्यांचे देखील patches कमी होतात.

• त्वचेचे आजार:
पांढऱ्या रुईच्या पानांचा आणि चिकाचा उपयोग इसब (Eczema), खरूज (Scabies) आणि त्वचेच्या इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी होतो,

• संधिवात:
पांढऱ्या रुईच्या पानांचा उपयोग गरम करून सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी होतो,

• दातदुखी:
रुईच्या चिकाचा उपयोग दातदुखी कमी करण्यासाठी होतो,

• पचनक्रिया:
रुईच्या पानांचा उपयोग पचनक्रिया सुधारण्यासाठी होतो,

• डोकेदुखी:
रुईच्या पानांचा लेप डोक्यावर लावल्याने डोकेदुखी कमी होते,

आध्यात्मिक आणि वास्तू उपयोग:
• समृद्धी:
रुईचे झाड घरात असल्यास किंवा घरात त्याची पूजा केल्यास घरात समृद्धी येते, असे मानले जाते,
• नकारात्मक ऊर्जा:
रुईचे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करते,

रुईचे व्यवहारातील उपयोग:
ही वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न चिडता ते बाहेर निघते.कातडीवर कुठेही मोस, मोड, ई. असेल तर चिकाचा वापर करतात. श्वेतकुष्ठावर ऊपाय करतानाता ही वनस्पती वापरले जाते पुर्ण पंचांग म्हणजे पाने, फुले, फळे, मुळे, खोड हे सर्व वापरले जाते.त्वचारोगावर गुणकारी आहे. विंचुदंशावर ऊतारा म्हणून चिक वापरला जातो.बुरशीनाशक म्हणून ऊपयोगी आहे.ताप, गाऊट, कुष्ठ रोग यावर हि वनस्पती औषध म्हणून वापरतात.पचनसंस्थेचे विकार,गँसेस,पेटके येणे,घामोळ्या, सुज, जळजळ,पुटकूळ्या, संधीवात, अल्सर, कफ ई. वर पण गुणकारी आहे. इतकी व्यापक गुणकारी वनस्पतीचे गुण कदाचीत आपल्या पुर्वजांनी ओळखले असावे व म्हणूनच पांढरी रूई पुजनिय झाली असावी! पांढरी रूईची फुले सुकवून नंतर ती थोडी गरम करून त्याची पूड करावी आणि ती दोन चिमूट पूड मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो. मुका मार लागल्या ठिकाणी रूईची पाने तव्यावर गरम करून त्याने शेकावे. डायबेटिसच्या पेशंट ने रूई ची पाने तळपायाला बांधून मोजे घालावे व चार तास ठेवावे. शुगर कमी होते.

रुई आणि अध्यात्म:
रुई मदार ही वनस्पती आपल्याला सर्वत्र आढळते तिला रुई मंदार असे म्हणतात. किंवा रूचकीन देखील म्हटले जाते. काही ठिकाणी रोही म्हटले जाते. सफेद रुई मात्र खूप दुर्मिळ असते. ती खूप शुभ मानले जाते. या वनस्पतीचे आयुर्वेदिक आणि अध्यात्मिक खूप चांगले महत्त्व आहे. अध्यात्मिक महत्त्व असे की हिंदू धर्मामध्ये एखाद्या लहान मुलाचा अकस्मात मृत्यू झाला तर त्यांचा अंत्यविधी वेगळ्या पद्धतीने केला जातो पण मात्र जर वयात आलेला मुलगा असेल आणि त्याचा जर अकस्मात मृत्यू झाला तर त्या मुलाचा ही रुईमंदार झाडाशी लग्न लावले जाते, कारण हिंदू धर्मामध्ये रुई मंदार अध्यात्मामध्ये स्त्रीलिंगी मानले जाते तिला श्री म्हटले जाते आणि म्हणून त्याचे लग्न लावून त्याला अग्निडाग दिला जातो आणि आजही ती प्रथा चालू आहे म्हणून हे एकच असे झाड आहे की तिच्याशी लग्न लावले जाते.

धार्मिक उपयोग:
• शनिवारी आणि हनुमानाची पूजा:
रुईच्या झाडाची पाने शनिवारी हनुमानाला अर्पण केली जातात, असे ही मानले जाते की यामुळे शनिदेवाचा प्रकोप शांत होतो आणि हनुमानाची कृपा लाभते.
• गणेश पूजेत उपयोग:
गणेशोत्सवात रुईच्या पानांचा वापर केला जातो. गणपतीला रुईची फुले आणि पाने अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.
• पुष्य नक्षत्रात मुळीची पूजा:
रविवारी पुष्य नक्षत्रावर रुईची मुळी घरी आणून तिची पूजा केल्यास संतानप्राप्तीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात, असे मानले जाते.

• धनप्राप्तीसाठी:
काही मान्यतांनुसार, रुईच्या झाडाची मुळी घरात ठेवल्यास किंवा तिची पूजा केल्यास धनप्राप्ती होते, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी:
रुईचे झाड घराच्या बाहेर लावल्यास किंवा घराच्या आजूबाजूला असल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.
मंदार व रुई ही झाडे एकाच वर्गातली असून या दोहोंमध्ये विशेष फरक नाही. मंदाराचे झाड पांढरे व भुरकट असते, त्यास पांढरी फुलें येतात आणि रुईच्या झाडाला पांढरी जांभळट फुले येतात. यापेक्षां या दोन्ही जातीच्या झाडांत फारसा भेद नाहीं. रुईच्या झाडाला हिंदधर्मशास्त्रांत बरेच महत्त्व आहे. एखाद्या पुरुषाला तिसरा विवाह कर्तव्य असेल, तर त्याने प्रथम अर्कविवाह ( रुईच्या झाडाशी लग्न ) करुन नंतर इच्छित वधूशी विवाह करावा असे धर्मशास्त्र आहे. आणि याची सत्यता खालील उताऱ्यावरून वाचकांच्या लक्षांत येईल.

त्रिलोकवासिन् सप्ताश्व छायया सहितो रवे ।
तृतीयोद्वाहजं दोष निवारय सुखं कुरु । १ ।।

तसेंचः-
नमस्ते मंगले देवि नमः सवितुरात्मजे ।
त्राहि मां कृपया देवि पत्नी त्वं म इहागता ।।
अर्क त्वं ब्रह्मणा सृष्टः सर्वप्राणिहिताय च ।
वृक्षाणामधिभूतस्त्वं देवानां प्रीतिवर्धनः ।।
तृतीयोद्वाहजं पापं मृत्यु चाशु विनाशय ।।

‘धर्मसिंधु’
अर्कविवाहामुळे रुईच्या झाडाला धर्मशास्त्रात कसे महत्त्व आले आहे, याची कल्पना वाचकांना वरील उताऱ्यावरुन होण्यासारखी आहे. तसेच हिंदू म्हणविणाऱ्या कांहीं जातींत विवाहसमयीं वधूने वराला रुईच्या फुलांची माळ घालण्याची रूढी असल्याचेंहि वाचकांना माहीत असेलच. रुईच्या झाडाला येणारे पांढरे फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे. शास्त्राच्या आधारे हे महादेवाला 108 पटीत वाहिले तर आपली मनोमन इच्छा पूर्ण होते.

घरावर कोणाशी उपाय नजर असेल किंवा कुटुंब संकटात सापडले असेल त्यावेळेस रुईचे झाड घराबाहेर अवश्य लावा.
श्रावण महिन्यात हरतालिका पूजनात वापरतात. श्रावण महिन्यात हरतालिका पूजनात रुईचे फुल महत्वाचे असते. अशी आख्यायिका आहे कि पार्वती ज्या वेळेस खडतर उपवास करण्याची त्यावेळेस कित्येक वर्षे ती फक्त रुईची पाने खायची. ही आख्यायिका असली तरी रुईचे महत्व यातून अधोरेखित होते. तंत्र क्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांच्या उपयोग केला जातो. असेच एक झाड आहे रुईचे. हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे. ज्यांचा शनी विक्री आहे त्यांनी दर शनिवारी महादेवाला रुईची पाने हार करून घालावित त्यामुळे शनीचा त्रास कमी होतो असे मानतात. महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्र शास्त्रात या झाडाचे विशेष मह त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या घरामध्ये रुईचे झाड असते तेथे कायम सुख-समृद्धी राहते या लेखातील अध्यात्मिक व धार्मिक विधाने ही समाजमान्यतेवर आधारित आहेत त्यास शास्त्रीय आधार असेलच असे नाही.

संदर्भ:
मराठी विकिपीडिया – किशोर कुलकर्णी
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे यांचे लेख
‘धर्मसिंधु’
गुगल वरील बरेच लेख
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
११/०८/२०२५

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 117 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on आयुर्वेद व जडीबुटी भाग १२: हनुमान व शनीप्रिय: रुई वनस्पती (Calotropis gigantea),

  1. Thank you very much for publishing knowledgeable article on crown flower.I want to know in detail about this plant of its medicinal uses.It will be my honor if I will get this opportunity.

Leave a Reply to Rashmi Kamlesh Murudkar Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..