नवीन लेखन...

म्हावरा

खडखडे लाडू नि, मालवणी खाजा; जेवणाक म्हावरा व्हया, फडफडीत ताजा रोज आमच्या चुलीर, म्हावराच शिजो झक मारत जावंदे तो, बर्गर नी पिझ्झो जिताडा, सरंगो, रावस नि तारली; डेंग्यांका मोडून आमी, खाताव ती कुर्ली पापलेट , सुरमय , बांगडो का मिळो; वासावर सांगतलाव, ताजो की शिळो नीट करून झालो, सुंगठ्याचो वाटो; की वाटपाक वल्या व्हयो, वरवंटो-पाटो धणे-मिरी, […]

दाम करी काम…

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. […]

पर्यटन – शिक्षण

साधारणत: सुट्ट्यांचे दिवस जवळ यायला लागले की टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसेसमध्ये गर्दी वाढू लागते. आणि अर्थातच सुनियोजित ट्रॅव्हल ऑपरेटरकडे आपला कल जातो. […]

पैशाचे डिजिटल रूप

रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले. […]

गुंतवणूक : भविष्यकालीन अर्थवाहिनी

डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या बँकांमधील ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळते. परंतु या योजनेत प्रायमरी सहकारी संस्थांचा समावेश नाही. बचत, चालू, रिकरिंग खाते व मुदत ठेव या सर्व प्रकारच्या ठेवींना डीआयसीजीसीचे पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध आहे. […]

काळ्या पैशाचे गणित

काळ्या पैशाचा संग्रह सामान्यपणे ‘हाय डिनॉमिनेशन’ चलनी नोटांमध्ये केला जातो. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चलनी नोटांमध्ये व्यवहार करण्यासाठी चलनी नोटांमध्ये आर्थिक व्यवहार रोखीने करताना, व्यवहारात चलनी नोटांच्या रोख किमतीवर मर्यादा घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करून व्यवहार केल्याचे आढळून आल्यास त्याला दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. […]

कोकणातील पत्र(क)कारिता

कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे. […]

पैसा म्हणजे काय?

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. मूल्यमापन हे पैशाचे महत्त्वाचे कार्य आहे. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. […]

वानप्रस्थाश्रमातील मूलभूत विचार

आतापर्यंत आपण पैसा, पैसा आणि पैसा हाच आपला सखा, मित्र, गणगोत समजत होतो. त्याऐवजी सखा भगवंत झाल्याने उद्वेग, चिंता, काळजी नष्ट होऊन त्याऐवजी आता मानसिक समाधानाची प्राप्ती आपल्याला होते आहे. त्यामुळे सर्व प्रापंचिक, भौतिक वस्तुंवरील आपली आसक्ती सहजपणे कमी होते आहे. हे आत्मपरीक्षण, त्यातून प्राप्त झालेली अनुभूती हीच आपल्याला जीवनाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे कृतकृत्यतेकडे घेऊन जाईल. […]

ट्रॅव्हल अॅप्सची दुनिया 

आजच्या तरुणाईला खरं वेड लावलय ते मोबाईल आणि इंटरनेट यांनी. प्रत्येक गोष्टीत मदत हवी ती गुगलची. ( खरंतर सर्च इंजिन म्हणायला हवं पण आपण सर्रास गुगलच म्हणतो, असो.) पण नेमकं काय शोधायचं या सर्च इंजिनवर (किंवा गुगलवर म्हणा )? आजच्या तरुणाई कडून नक्की शिकण्यासारखी एक गोष्ट ती म्हणजे कितीही इंटरनेटवरून माहिती शोधली, बुकिंग केलं तरी ते प्रत्येक गोष्टीचा रिव्हवू त्याला मिळालेले रेटिंग यावरून निर्णय घेते. अर्थात ते तंतोतंत खरं असतं असं काही नाही. […]

1 26 27 28 29 30 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..