नवीन लेखन...

अर्थसंकल्प आणि पैसा

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर ठरत असल्याने भारतासारख्या विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तुटीचा अर्थसंकल्प भाववाढ घडवून आणणारा असल्याने त्यावर योग्य नियंत्रण नसेल तर चलनवाढीचे भय संभवते. […]

कोकणातील समुद्रकिनारा

कोकणातली खूप मंदिरे… सागरकाठावरी! भक्ती गाठते मुक्तीकिनारा, बसून लाटांवरी! कृतज्ञतेचे मीठ सांडते, रात्रंदिन येथे, जाळ्यामध्ये येती धावत, माशांचेच जथे! आकाशाचा रंग पांघरून स्वच्छ निळे पाणी ओठावरती लाटांच्या  तर, फेसांची गाणी! होड्या झुलती दबा धरुनिया, पकडाया मासे, शकुनी मामा होऊनी कोळी, जाळ्यांचे फासे! समुद्र भेटे जिथे नभाला क्षितीजरेषा निळी! सांजसूर्य भेटाया येता, क्षितीज त्याला गिळी! दगडांचा आडोसा […]

कोकणातलो पाऊस

कोकणातलो पाऊस मिरगाचो बांधावर बळी नारळ  कोंब्याचो पेरणीचे दिवस इले शेतकरी कामाक लागले पावस इलो कोपऱ्यात मांगराच्या पत्र्यात, अळवाच्या पानात मनाचो झोपाळो झुललो मातयेच्या वासान, नाच नाचान गेलो म्हातारी आजी, भाजता काजी, आता रूजतली कुरडू भाजी कोपऱ्यात, व्हाळात माझे चढले राजो, सोनो आक्या घेवन धावले बघता बघता सांज झाली, कोकणातल्या पावसाक सुरवात झाली – आर्या सापळे […]

अतुल्य भारत

सप्त महासागरावर तरंगणारे हे अंडाकृती विश्व म्हणजे एक प्रकारचे महान बेटच आहे आणि या महाबेटाचे मध्यवर्ती ऊर्जा केंद्र म्हणजेच अलौकिक अशा अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे ‘जंबुद्वीप’ (Rose apple island) म्हणजेच आपला हिंदुस्थान होय. प्राचीन ग्रंथात या जंबुद्वीपाचे वर्णन, महत्त्व सांगितले आहेच. […]

छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम

मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही. […]

लावण्यखणी भूलोकीची!

लावण्यखणी ती भूलोकीची निसर्गसखी कोकण दुहिता रंगबावरी लाजलाजरी इहलोकीची सुंदर कविता! नागमोडी कितीक वळणे खट्याळतेने वाट अडविती पायघड्या अन् घाली सुंदर लाल देखणी कोकणमाती डोंगर माथ्यावरून खाली अल्लड झरे झेपावत येती पदन्यास  ऐकून तयांचा वेडी होते कोकण धरती! समुद्र वैभव कोकणातले भुरळ घाली मना-मनाला पहाटवेळी शांत किनारा देई विसावा जिवाशिवाला! बहर हिरवा झाडे हिरवी पाचूचे हिरवे […]

कोकणचा कुलाचार

कोकणाचा कुलाचार भावे पाळतो वरूण इथे निसर्ग भरतो अन्नपूर्णेचे बोडण सह्याद्रिचे कातळकडे जणू मांडिले चौरंग हिरवट रानवेली, रांगोळीत पुष्परंग शेते-खाचरे रेखीव मांडलेल्या काथवटी त्यात केळीची ग पाने हिरवळीची गोमटी ताडामाडांसह उभे स्वागता आगर सुवासिनींचे चरण धुतो अरबी सागर सुरंगी-अबोलीचे देवीलागी वळेसर आंबे फणस जांभळे नैवेद्याला फलाहार अष्टगंधाचा दरवळ देती बनात केवडे देवीच्या पूजेला नारळ-सुपारी अन् विडे […]

गंध व्हा

गंध व्हा, उधळा स्वतःला फूल आधी व्हा तुम्ही रंगवुनी ह्या जगाला इंद्रधनुषी व्हा तुम्ही उजळण्या हे विश्व सारे उजळणारी ज्योत व्हा ज्योत म्हणुनी मिरवताना राख बनण्या सिध्द व्हा विश्व सारे उजळताना ज्योत जळते अंतरी प्रेमपक्षी फुलवताना चंद्र झुरतो अंबरी व्हा प्रकाशी गा मनाशी गीत व्हा विश्वातले जीवनाचे व्हा प्रवासी शब्द व्हा गीतातले कोवळे ऊन व्हा अन् […]

माझं कोकण

स्वसामर्थ्याच्या तपोबलाने, सागरास मागे हटवून परशुरामाने निर्माण केला, हा प्रदेश सुंदर कोकण वळणावळणाची आहे, माझ्या कोकणची वाट किती वर्णावे सौंदर्य तियेचे, सौंदर्याचा थाट जरी बदलली अवघी दुनिया, जरी बदलला काळ माझ्या कोकणच्या मातीसंगे, जुळली माझी नाळ शहरात राहिलो, तरी खुणावते कोकणातली माती कौलारू घर कोकणातले, दिसते या डोळ्यांपुढती देशामध्ये स्वातंत्र्याची, ज्योत जयांनी चेतविली स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीची, ही […]

कोकणातील कातळशिल्पे

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे. […]

1 25 26 27 28 29 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..