नवीन लेखन...

म्हावरा

 

खडखडे लाडू नि, मालवणी खाजा;

जेवणाक म्हावरा व्हया, फडफडीत ताजा

रोज आमच्या चुलीर, म्हावराच शिजो

झक मारत जावंदे तो, बर्गर नी पिझ्झो

जिताडा, सरंगो, रावस नि तारली;

डेंग्यांका मोडून आमी, खाताव ती कुर्ली

पापलेट , सुरमय , बांगडो का मिळो;

वासावर सांगतलाव, ताजो की शिळो

नीट करून झालो, सुंगठ्याचो वाटो;

की वाटपाक वल्या व्हयो, वरवंटो-पाटो

धणे-मिरी, लसूण नी, लागतलो कांदो;

बेडगी मिरची नसात तर, होतलो वांदो

चाटशाल बोटा असा, मोरीचा तिकला;

चवदार आमटीतला, एक एक शिपला

मांदेली, पेडव्याचा, असा खमंग सार ता;

खाशाल तर मटनाच्याव, तोंडात मारता

तांदळाच्यो भाकर्‍यो नी भाताची रास;

वांगडा आमकां लागताच, म्हावऱ्याचो वास

कुळदाची पीटी, नी सोलाची कढी;

म्हावरा जर मोठा तर, मेजवानी बडी

वला जर नसात तर, सुका तरी लागता;

करदी, जवल्याच्या, वासातंव भागता

खल्लास जर नाय तुम्ही, कुस्करला सुकट

सांगतंय मी तुमचो, जलमच फुकट

मालवणी मसालोच, असो असा खास;

आमसुलान, तिरफळान घमघम तो वास

चुलीवर रटरट, उकाळता कालवण;

तेवा वाटता स्वर्ग म्हंजे, आपला ह्या मालवण

-कॅप्टन वैभव दळवी

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..