नवीन लेखन...

ट्रॅव्हल अॅप्सची दुनिया 

आजच्या तरुणाईला खरं वेड लावलय ते मोबाईल आणि इंटरनेट यांनी. प्रत्येक गोष्टीत मदत हवी ती गुगलची. ( खरंतर सर्च इंजिन म्हणायला हवं पण आपण सर्रास गुगलच म्हणतो, असो.) पण नेमकं काय शोधायचं या सर्च इंजिनवर (किंवा गुगलवर म्हणा )? आजच्या तरुणाई कडून नक्की शिकण्यासारखी एक गोष्ट ती म्हणजे कितीही इंटरनेटवरून माहिती शोधली, बुकिंग केलं तरी ते प्रत्येक गोष्टीचा रिव्हवू त्याला मिळालेले रेटिंग यावरून निर्णय घेते. अर्थात ते तंतोतंत खरं असतं असं काही नाही.

इंटरनेटवरून पर्यटनाची माहिती शोधताना सगळ्यात सोप्पं म्हणजे तुम्ही तुमच्या गुगल Discover वर ‘ट्रॅव्हल’ ही तुमची आवड म्हणून टाकू शकता. गुगल तुम्हाला स्वतःच रोजच्या रोज अपडेट करेल आणि मग तुम्हाला ट्रॅव्हल संदर्भात विविध गोष्टी दिसायला लागतील.

याशिवाय काही अॅप्स तुम्ही नक्की डाऊनलोड करू शकता की जे तुमच्या फिरण्याच्या छंदाला खतपाणी घालतील.

अॅप डाउनलोड करताना एकाच अॅपवर किती अधिक गोष्टी आहेत हे बघणे खरंतर गरजेचे आहे. ज्याप्रमाणे बातम्यांसाठी ऍग्रिगेटर ( NEWS Agrigator) आहेत तसे ट्रॅव्हलसाठी कमी आहेत, पण गुगल ट्रॅव्हल तुम्हाला चांगली मदत करू शकतो.

काही अॅप्स आहेत जे निश्चित आपली मदत करतात.

१. Holiday IQ

हे अॅप तुम्हाला विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती देते. सोबतच त्या स्थळाच्या सभोवतालच्या इतर स्थळांची माहिती पुरवते. तुमच्या राहण्याच्या सुविधा खाण्याच्या आवडीसुद्धा यावर शोधू शकता. तुम्ही या अॅपवर आपला ट्रॅव्हल प्लॅन आखू शकता. सोबतच तुमच्या प्रवासातला डे प्लान बनवू शकता.

२. Google Trips-Travel planner

हे एक उत्तम Apps आहे. तुम्ही तुमच्या आवडी निवडी, खाणे पिणे, स्थळ, वेळ या सगळ्यांची नोंद Apps वर करायची. या सगळ्याची सांगड घालून तुमच्यासाठी एक परफेक्ट प्लॅन हे Apps स्वतः आखून देतो. अर्थातच गुगलचे असल्यामुळे तुमच्या Gmail वर तुमच्या रिझर्वेशनची अपडेट्स पण देतो आणि सोबतच जर तुम्ही डे प्लॅनसुद्धा तुमच्या Gmail वर जोडून देतो. एका कुटुंबासाठी किंवा एकट्याने फिरणाऱ्या फिरस्त्यांसाठी एक झकास Apps आहे.

३. Trip Advisor

एक उत्तम Apps आहे कारण हा तुम्हाला तुम्ही शोधत असलेल्या पर्यटनाच्या जागा, हॉटेल्स प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती पुरवतोच. पण या Apps वर तुम्ही लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा वाचू शकता. त्यांच्या अनुभवातून तुम्ही ठरवू शकता की तुम्ही ठरविलेल्या स्थळी भेट देताना नक्की काय काळजी घ्यायला हवी.

४. Incredible India Calendar

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आणलेले हे Apps पर्यटनाची आवड असलेल्या प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर ठेवावे असे आहे.

भारतामध्ये साजरे केले जाणारे विविध सण त्या अनुषंगाने होणारे विविध कार्यक्रम, विविध आर्ट फेस्टिवल, भारतातल्या प्रसिद्ध जत्रा, पर्यटन स्थळे, आसपासची प्रेक्षणीय स्थळे, प्रत्येक राज्य व त्यातील जिल्ह्यानुसार सर्व माहिती यात संकलित केली आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत आहोत त्याप्रमाणे आपले कॅलेंडर आपण यात सेट करू शकतो आणि हे Apps आपल्याला त्याप्रमाणे आठवण करून देते. (रिमाईंडर)

५. Google Map आणि Accu Weather शी ही दोन वेगवेगळी अॅप्स तुम्ही प्रवासाला निघताना निश्चित वापरायला हवी. Accu Weather आपण ज्या ठिकाणी चाललोय तिथल्या हवामानाची कल्पना देते. तेवढीच आपली तयारी होते की नक्की काय काय घेऊन फिरायला निघायचं.

६. Make My Trip- अलीकडच्या काळात खूप प्रसिद्ध असे अॅप. हॉटेल बुकिंग, ट्रेन बुकिंग, विमान बुकिंग सोबतच तुम्ही जात असलेल्या ठिकाणाचे स्थानिक स्थळांना भेटी देण्यासाठीची कार/ बस बुकिंगची एकत्रच सुविधा देते.

७. OYO/ Trivago
OYO प्रवास करताना राहणे किंवा हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग हा एक मोठा प्रश्न असतो. Oyo सारखी अॅप्स आपला एक मोठा प्रश्न मिटवतात. असे इतर अनेक Apps आहेत. पण यासारख्या Appsवरून बुकिंग करताना काही बाबी निश्चित लक्षात ठेवाव्यात. रेटिंग आणि प्रतिक्रिया नक्की वाचून शहानिशा करावी. बुकिंग करा पण शक्यतो अॅडव्हान्स देऊ नये. कारण फसगत होण्याची शक्यता असू शकते. अशा बऱ्याच अॅपवर चित्रात दिसणाऱ्या व्यवस्था व प्रत्यक्षातल्या सोयी यात बरेचदा तफावत असते. त्यामुळे पैसे जर आगाऊ भरले असतील आणि सोयी नसतील तर डोक्याला मनस्ताप होऊन तुमच्या पर्यटनाची मजा जाऊ शकते.

या सारखी अजून खूप Apps आहेत.

पण जर तुम्ही ऑनलाइन बुकिंग करत असाल तर ट्रीव्हागो हा मस्त पर्याय आहे.

Trivago हा एक ऍग्रिगेटर आहे. एकाच वेळी oyo सारख्या ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणाऱ्या किंवा विमानाच्या बुकिंग करणाऱ्या असंख्य Apps आणि वेबसाईटवर एकावेळी सगळी माहिती शोधतो. तुम्हाला हॉटेल आणि विमान बुकिंगचे असंख्य पर्याय काही क्षणात देतो.

८. तुम्ही विमानाने किंवा ट्रेनने प्रवास करत असाल तर google flights आणि IRCTC ही दोन Apps नक्की हवीत. कारण तुमच्या प्रवासाच्या सगळ्या बुकिंगची काळजी निश्चित घेतील.

९. प्रवासात निघताना मन शांत हवं. म्हणून तयारी जोरदार करा पण पैश्याचं गणित सांभाळून. थोडी कॅश खिश्यात कमी ठेवा. तुमच्या मोबाईलवर एखादे पेमेंट Apps नक्की ठेवा. जे तुम्हाला आजच्या डिजिटल इंडियात नक्की उपयोगी पडेल. पे-टीएम, फोन पे, गुगल-पे यांची नक्की मदत घ्या.

Homestay

अलीकडच्या काळात काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी सॉलिड अनुभवायचं म्हणून प्रवासाला निघणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी Homestay हा एक मस्त पर्याय आहे. Homestay सुचवणारे air anb सारंच एक Apps आहे. ईशान्य भारतात जर फिरणार असाल तर Homestay मस्त पर्याय आहे. आपण तिथल्या खऱ्याखुऱ्या संस्कृतीचा खाण्यापिण्याचा मस्त अनुभव घेऊ शकतो. भारतात खूप ठिकाणी अशा व्यवस्था आहेत पण तुम्हाला तुमच्या मुशाफिरी अगोदर इंटरनेट वर मुशाफिरी करावी लागेल. तर निश्चितच अशा ठिकाणाची माहिती मिळेल.

पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी इंटरनेटची मदत होतेच यात काही वादच नाही. आपण जेव्हा अॅपवर किंवा इंटरनेटवर माहिती शोधत असतो तेव्हा थोडा वेळ देऊन जर काही ट्रॅव्हल ब्लॉग वाचले किंवा ज्या स्थळाला भेट द्यायची आहे त्या संदर्भातील फेसबुक पेज वाचलीत तर तुमच्या या प्रवासात तुम्हाला निश्चितच काही नवीन ठिकाणं भटकंतीसाठी सापडतील.

 –मकरंद मराठे

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..