आत्मनिर्भरता
परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे. […]
परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे. […]
अखंड कोकणात जसे काँग्रेसी विचारांचे प्राबल्य होते तसे समाजवादी विचारांचा भारी पगडा होता. कार्यकर्ते आणि राजकारणही विचार, निष्ठा, सामाजिक बांधिलकी यावर आधारलेले होते. परंतु त्याकाळच्या शिवसेनेतही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातीलच कार्यकर्ते होते. शिवसेनेतही मुंबईचा पहिला महापौर होण्याच भाग्य प्रि. वामनराव महाडिकांना लाभलं होतं. तत्पूर्वी काँग्रेसच्या स. का. पाटील या मालवणी सूपूत्राची मुंबापुरीवर हुकमत होती. जवाहरलाल नेहरू यांचे स. का. पाटील यांच्याशी फार जवळीक होती. […]
गुंतवणूक ही उत्तम प्रकारे करणं, पैशाला कष्ट करायला लावणं हे अतिशय आवश्यक असतं. आजही आपली कुटुंबपद्धती उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे आपली पुढची पिढी आपली काळजी घेतेच, पण आपली अशी अपेक्षा असते की आपला आर्थिक भार पुढच्या पिढीवर पडू नये. तसेच पुढच्या पिढीची जी स्वप्नं आहेत, त्या स्वप्नपूर्तीसाठीसुद्धा आपला हातभार लावणं ही प्रत्येकाची इच्छा असते. […]
अर्थात त्यांच्याबरोबर ही कामे करताना माझी खूपच धावपळ व्हायची. कधी कंटाळाही यायचा. मात्र अंक प्रसिद्ध व्हायच्यावेळेस इतका उत्साह असायचा की जणू नवं अपत्यच बघायला मिळणार आहे. त्याची नाकीडोळी म्हणजेच अंतरंग बघून समाधान व्हायचं. […]
आजकालचा महत्त्वाचा दस्तावेज आणि परवलीचा शब्द म्हणजे पासपोर्ट. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. पासपोर्ट म्हणजे पारपत्र. आपला देश पार करून दुसऱ्या देशात जर आपणाला जायचे असेल तर आपल्या सरकारकडून मिळालेली रितसर लेखी परवानगी म्हणजेच पासपोर्ट. कोणत्याही भारतीय नागरिकास हा पासपोर्ट मिळू शकतो. […]
कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत. आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते. […]
अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते. […]
प्राचीन काळात भारतवर्षात पाकशास्त्रसुद्धा अत्यंत समृद्ध होते. अनेकविध शेकडोंच्या संख्येने असलेले पदार्थ, खाण्याच्या पद्धती व भोजनविधी यांनी प्राचीन पाकशास्त्र संपन्न आहे. भोजन शुद्ध, स्वादिष्ट व हितकर होण्यासाठी ज्याप्रमाणे पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे लागते, तेवढेच महत्त्व भोजनासाठी उपयोगात आणल्या जाणार्या पात्रांबाबत (भांड्यांबाबत) सुद्धा लक्ष द्यावे लागते. […]
कोकणात मंदिरांबरोबरच विविध देवतांच्या सुट्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत. कदाचित त्यांची इथे पूर्वी मंदिरे असावीत. पण आज ती कुठे दिसत नाहीत. आज मात्र या मूर्ती खास कोकणी पद्धतीच्या साध्यासुध्या कौलारू देवळात ठेवलेल्या दिसतात. कोकण हा जसा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढी-परंपरा आणि विविध मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला प्रदेशही आहे. कोकणातली बरीच मंदिरे अगदी […]
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे ‘लेस कॅश व्हीजन 2018’ असे पत्रक तयार केले. ज्यात ग्राहकांसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. डिजिटल बँकिंग आणि डिजिटल रुपी लोकप्रिय करण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये व्यापारी बँकांचाही फार मोठा सहभाग व सहकार्य आहेच. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions