साहित्यिक भा. द. खेर
“केसरी’ गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि. स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या “केसरी’च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स. गर्गे यांनी संपादित केलेल्या “यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार’ या पत्रसंवाद ग्रंथांतील भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास’ किती होता हे ध्यानात येते. […]
