नवीन लेखन...

साहित्यिक भा. द. खेर

कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङ्मय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारांत लीलया संचार करताना आपल्या प्रतिभेची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिककथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङ्मय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारांत लीलया संचार करताना आपल्या प्रतिभेची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक भा. द. खेर यांचा जन्म १२ जून १९१७ रोजी झाला.

भा. द. खेर हे पंचवीस वर्षे केसरीचे उपसंपादक होते. तत्पूर्वी त्यांनी अग्रणी, हिंदुराष्ट्र, भारत आदी दैनिकांत काम केले होते. वसंतराव काणे यांच्या “रोहिणी’ मासिकाचे संपादनकार्य काही काळ त्यांनी केले. तसेच ‘सहयाद्री’ मासिकाचे ते दहा वर्षे संपादक होते. भा.द.खेर हे मराठी लेखक वि.स.खांडेकर यांचे मामेभाऊ लागत. खेर स्वत:ला प्राध्यापक श्री. म. माटे यांचे शिष्य म्हणवून घेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना सामाजिक कार्यातही ते तेवढ्यात आत्मीयतेने सहभागी होत. “केसरी’ गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि. स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या “केसरी’च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स. गर्गे यांनी संपादित केलेल्या “यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार’ या पत्रसंवाद ग्रंथांतील भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास’ किती होता हे ध्यानात येते. केवळ लेखन विषयाशी निगडित असलेले मनस्वी पत्रकार असून, अखंड नवनवीन साहित्यनिर्मितीचा ध्यास असणे, हेच खेरांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

भा. द. खेरांनी १९४१ ते १९८४ या काळात त्यांनी विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे ‘अधांतरी’, दे प्रिन्सेस’ हे त्यांनी केलेले अनुवादही गाजले. शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’, किंग लियर, विंटर्स टेल’ इत्यादी नाटकांचे अनुवाद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राची व साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री गुलाबराव महाराज, गजानन महाराज, साईबाबा आदी महात्म्यांची महती पटवून देणारी पुस्तके, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा’ असे संकीर्ण लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५००० हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते. ‘हसरे दु:ख’ हे चार्ली चॅप्लिनवरील भा. दं चे पुस्तकही वाचनीय आहे.

भा. द. खेर यांचे २१ जून २०१२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..