संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी

ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी यांनी आपल्या गाण्याची तालीम गिरीजा शंकर चक्रवर्ती यांच्या कडून घेतली. नंतर त्यांनी रामपूर -सहसवास घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसेन खान आणि बनारस घराण्याच्या रसूलन बाई यांच्या कडे गाण्याचे शिक्षण घेतले. […]

भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू

सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कल्पक कर्णधार अशी असलेल्या कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू यांना सात कसोटीत ३५० धावाच करता आल्या तरी तब्बल सहा दशके त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले. […]

लेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा

आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. […]

जेष्ठ गीतकार तन्वीर नकवी

तन्वीर नकवी यांचे खरे नाव सय्यद खुर्शीद अली. तन्वीर नकवी यांचे वंशज मूळचे इराणचे. १९४० च्या दशकात तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांसाठी गीत लिहिले. […]

मराठी चित्रकार आणि नेपथ्यकार पुरुषोत्तम श्रीपत काळे

पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे. […]

ज्येष्ठ लेखिका गिरिजा उमाकांत कीर

गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. […]

बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. […]

संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल

एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. […]

ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. […]

1 2 3 221