नवीन लेखन...
Avatar
About रामदास किसन तळपे
ग्रामीण संस्कृती
Contact: Facebook

केक्या दादा

ग्रामीण भागात सर्वात कलंदर कलाकार कोण असेल तर तो म्हणजे केक्या दादा. केक्या दादाला ओळखत नाही असा शोधूनही माणूस सापडणार नाही. […]

आमचा नाना आप्पा

नाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही. […]

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर – जीवन चरित्र

काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत. त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं. […]

साधीभोळी माणसं

गावातील अतिशय प्रामाणिक माणुस, दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५ असेल. […]

नागपंचमी

ग्रामीण भागात पूर्वी व आतासुद्धा सणांना फार महत्व असते. हिंदू धर्मात पहिला सण नागपंचमी तर शेवटचा सण हा अक्षय तृतिया असतो..अक्षय तृतीया नंतर जवळ जवळ दोन अडीच महिने कोणताही सण नसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अबालवृद्ध नागपंचमी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात . […]

गावाकडची खाद्य संस्कृती

आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक. ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. … . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे […]

जंगलातील एक दिवस

खुप दिवसातुन गावाला दोन तीन दिवस राहण्याचा योग आला होता. सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेत असतानाच मित्र काशिनाथ आला.त्याला चहा दिला.चहा पित असतानाच तो म्हणाला.आज काय काम आहे का तुला?काम नसेल तर चल रानात जाऊया..मध कुठे भेटते का पाहू…रानात हे शब्द उच्चारताच मी लगेचच होकार दिला.माझ्याकडे पाण्याची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पाणी थंड राहते.मी ती घेऊन […]

सर्पदंश

सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत…. ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर […]

सुगीचे दिवस

नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..