नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

गोष्ट “अशी” संपायला नको होती !

आयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात. […]

सांगितली “आजोबांची” कीर्ती !

राहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती. […]

बाप -लेक

यू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या ! […]

आत्मस्वरांच्या हाका !

आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो. […]

आडदांड, धटिंग पण- “आपला माणूस !”

विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा. […]

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत किती वेगळा आणि खराखुरा,ताजा वाटतो. स्वतःचे कलारंग अस्सलपणे उधळताना जाणवतो. ही राजची छाप त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमधून फिका,निस्तेज वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत. […]

‘मराठी भाषेचा नाट्यप्रवास’ – रायपूर !

मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. […]

प्रायश्चित्त – जितका अपराध मोठा, तितके प्रायश्चित्तही मोठेच !

आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच ! […]

उपऱ्यांची माती !

मुंबईच काय, महाराष्ट्रातील सर्वच महानगरे आता उपऱ्यांची वसतिस्थाने झालेली आहेत. मला मात्र अजूनही कोणी “पुणेरी किंवा पुणेकर” असं संबोधलं तर आवडत नाही. ताडकन माझा “खान्देशी बाणा ” उफाळून येतो. […]

हुंदक्यांचा “ओटीपी” !

अचानक वृत्तपत्रात बाळासाहेब मंगेशकर पुण्यातील सरपोतदारांकडे येणार असल्याचा आणि त्यांच्या गीतांवर आधारीत ” मानसीचा चित्रकार तू ” हा कार्यक्रम असल्याचं दिसलं. मला तो “हुंदक्यांचा ओटीपी (One Time Password) ” हातून गमवायचा नव्हता. आयुष्याची पूर्ण ८० वर्षे आई झालेल्या मोठ्या दीदींच्या निधनानंतर भावगंधर्व पहिल्यांदाच बोलणार होते. ओटीपी काही विशिष्ट वेळेसाठी असतो- त्यादिवशी तो दुपारी ४ ते सायंकाळी ८ पर्यंत व्हॅलिड होता. […]

1 14 15 16 17 18 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..