नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

‘चकीत’ करणारी नाती !

नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं. […]

घटनेच्या पृष्ठभागाखाली

ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते. […]

तथास्तू !

त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात उगाचच हॉर्न वाजवत गाडी फिरवायला सुरुवात केली. संतपूर सरांना हे पटले नाही. त्यांनी गाडीजवळ जाऊन त्यांना ठाम शब्दात समज दिली की “हा महाविद्यालयाचा परिसर आहे आणि सध्या परीक्षा सुरु आहेत. तुम्ही आमच्या आवारात येऊन गोंधळ घालू नका”. […]

‘कान्हा’ ची आगळीक आणि ‘श्याम’ची मनधरणी !

मग १९७० च्या “ट्रक ड्रायव्हर” या अनामिक चित्रपटात ( मी मनाच्या भूतकाळात हे नांव आणि गाणंही विसरून गेलो होतो. परवा “वेदांतश्री” च्या वासंतिक अंकात लताबद्दल लेख वाचताना अचानक तळाशी जाऊन बसलेले हे गाणे- “कान्हा रे कान्हा, तूने लाखो रास रचाए” उसळून वर आले) त्याची आगळीक नव्याने भेटली. […]

शाबासकी

मी तरुणाईत शिरलो तेव्हा – समोर मातीचे ढीग होते. त्यांनी सांगितले – ” यातून तुम्ही घडवा ” क्षणभरासाठी मी विश्वकर्मा झालो इतरांसारखा -इतरांबरोबर ! सोबतीला मेहनतीचं पाणी होतं अक्षरांची बीजे पेरायला खडू होते आणि चुकलेलं पुसायला डस्टर ! पहिल्या दमाने मी मूर्ती घडवायला बसलो पण मनासारखी निर्मिती होईना कोठेतरी ,काहीतरी चुकलं होतं. वारंवार तपासलं तरी न […]

काळाची लेखणी

“बॅरिस्टर ” केलं विक्रम गोखलेने! त्यानंतर सचिन खेडेकरने प्रयत्न केला. पण विक्रम तो विक्रमच! लागूंच्या नंतर खूपजणांनी ” नटसम्राट “चे शिवधनुष्य शब्दशः उचललं , पण नांव कोरलं गेलं ते फक्त श्रीराम लागू! […]

मेरा वो सामान “लौटा “दो !

माणसांची वैश्विक गंमत असते- सुरुवात “मी ” पासून होते. मग वाटेत नातं /नाती येऊन जोडली जातात की शब्द तयार होतो “आपण “. काळाच्या ओघात फक्त काही जिवलग नातीच पैलतीराला जाऊन थांबतात. […]

माई री, मैं कासे कहूँ पीर, अपने जिया की !

१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ ! […]

ज्याचा त्याचा “भूतकाळ”

भूतकाळ हे असे फक्त “स्वतःचे “असतात -फक्त स्वतःचे ! आसपासच्यांना कधी ते दुरून दिसतात, कधी हलकेच स्पर्शून जातात , पण एखादा “रुहानी ” आवाज वाला किशोर त्यांना छेदून जातो , एखादा गुलज़ार त्यावरची खपली काढतो. […]

प्रदूषणाभिमुख कार्यसंस्कृती!

कार्यसंस्कृतीवर परिणाम होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. अर्थात त्यांवर सहजासहजी एकमत होत नाही. प्रदूषित कार्यसंस्कृतीची व्याख्या संस्थेनुसार बदलत जाते आणि ती व्याख्या मतमतांतरे निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. मात्र धोक्याचे इशारे एकसारखे असतात. […]

1 13 14 15 16 17 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..