नवीन लेखन...

शिकण्याचं वय!

 

ही गोष्ट आहे भगवान रजनीश यांची. ओशो यांची. मानवाला प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या आध्यात्मिक गुरूंची. खरंतर

 

त्यांचं विपुल साहित्य जगात सर्वत्र उपलब्ध आहे. त्यांच्या कॅसेट आणि व्हिडिओ, सीडीच्या माध्यमातून त्यांचं चालणं, बोलणं

 

पाहता, ऐकता येतं. तरीही त्यांची ही गोष्ट पुन्हा एकदा सांगाविशी वाटतेय.

 

 

ओशो एकदा समुद्र प्रवासाला निघाले होते. प्रवास मोठा होता आणि काही दिवस जहाजावरच राहायचे होते. वाचन, संवाद आणि

 

डेकवरची भ्रमंती हा त्यांचा छंद किवा त्यावेळी वेळ घालविण्याचं साधन. डेकवरनं फिरत असताना अनेक देशांचे, विविध

 

वयोगटांतील आणि भाषेची माणसं भेटायची. काहींशी बोलणं व्हायचं तर काही केवळ स्मितहास्यानंच संवाद साधायचे. डेकवरच

 

एका बाजूला एक वृद्ध गृहस्थ एका टेबलाशी बसलेला असायचा. काहीवेळा त्याचं वाचन सुरू असायचं, तर काही वेळा तो लिहीत

 

असायचा. त्याचं लिहिणं म्हणजे एका पुस्तकात पाहायचं अन् लिहायचं असं होतं. समाधी लागावी अशी त्याची ती स्थिती

 

असायची. जवळपास कोणी आहे, नाही, आवाज येत आहेत या कशाचंही भान नसायचं त्याला. भगवान रजनीश तेव्हा एवढे

 

सर्वदूर ख्यातकीर्त झालेले नव्हते. त्या वृद्धाशी बोलावं असं त्यांना वाटे; पण त्याची समाधी पाहून ते पुढे जात. एके दिवशी मात्र

 

त्या वृद्धाशी संवाद साधायचाच असं त्यांनी ठरविलं. ते त्या वृद्धाकडे पाहातच आपली शतपावली करीत होते. त्याला त्रास होणार

 

नाही, अशा अंतरावर थांबून त्याच्याकडे पाहात होते. अखेरीस एका क्षणी त्यानं मान वर केली अन् रजनीश म्हणाले, ‘‘माफ

 

करा, पण मी इथं तुमच्यासमोर बसू शकतो का?’’ त्यानं मानेनंच होकार भरला. रजनीश बसले. आता संवाद

साधायचा होता.

 

भगवान

म्हणाले, ‘‘मी काही दिवस झाले तुमच्याशी बोलू इच्छितोय. तुम्ही हे नेमकं काय करातय?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘मी

 

चिनी भाषा शिकतोय.’’ चिनी भाषा शिकायला खूपच अवघड हे रजनीश जाणून होते. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला लिहिता येते?’’ तो

 

वृद्ध म्हणाला, ‘‘ नाही, अजून नाही; पण आता मला कोणी बोललं तर ती कळते. काही शब्द मी बोलूही शकतोय; पण लिहिणं,

 

शिकायला वेळ लागेल अन् भाषेवर प्रभूत्व मिळवायला त्याहूनही अधिक काळ लागेल.’’ ‘‘किती दिवस झालेत तुम्ही ही भाषा

 

शिकायला लागून?’’ रजनीशांनी प्रश्न केला. ‘‘तीन वर्षे झालीत. आणखी वर्ष-दोन वर्षांत लिहायला शिकेन. मग आणखी दोन

 

वर्षांत त्या भाषेतलं उत्तम साहित्य वाचीन. मग मला खर्‍या अर्थाने चिनी भाषा अवगत होईल, असं वाटतं.’’ रजनीशांनी त्या

 

वृद्धाकडे पाहिलं… पंचाहत्तरी तर नक्कीच पार केलेली असावी त्यानं अन् तो आणखी पाचेक वर्षांचं भाषा शिकण्याचं नियोजन

 

करीत होता.

 

 

रजनीशांना राहावलं नाही. त्यांनी विचारलं, ‘‘माफ करा; पण तुमचं वय काय असेल?’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘ऐंशी!’’ भगवान

 

आश्चर्यचकित झाले व म्हणाले,‘‘भाषा अवगत व्हायला आणखी पाच वर्षे लागणार. म्हणजे, जेव्हा तुम्ही या भाषेवर प्रभूत्व

 

मिळवाल तेव्हा तुमचं वय पंच्याऐशी असेल.’’ तो वृद्ध म्हणाला, ‘‘हो, खरंय ते,’’ भगवान म्हणाले, ‘‘इतकी वर्षे शिकल्यानंतर

 

त्या शिक्षणाचा वापर किती वर्षे करू शकाल असं तुम्हाला वाटतं?’’ आता तो वृद्ध सावरून बसला, म्हणाला, ‘‘बरोबर आहे तुमचा

 

प्रश्न. मी किती वर्षे त्याचा वापर करू शकेन? तुम्ही विद्वान दिसता. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझा जन्म झाला तेव्हा मला

 

कोणीही सांगितलं नव्हतं, की मी ऐंशी वर्षे जगणार आहे. आजही मला कोणी ठामपणे असं सांगत नाहीये, की मी पाचच वर्षे

 

जगणार आहे. मी किती जगेन हे तुम्ही सांगा. मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन.’’ भगवान रजनीश म्हणाले, ‘‘मी तुम्हाला

 

पाहात होतो. तुमच्याबद्दल खूप उत्सुकताही होती; पण एक वृद्ध माणूस म्हणून मी तुमच्याकडे पाहात होतो. आता मला कळलं,

 

की तुम्ही वृद्ध नाही आहात. तुम्ही मॅच्युअर्ड यंग आहात!’’

 

 

शिकण्याला वय नसतं आणि तारुण्याला वयाची तमा नसते, याची शिकवण ओशोंच्या या अनुभवावरून सहजी येते. स्वतः

 

ओशोंनी हा अनुभव याच आशयासह लिहून ठेवलेला आहे. या विश्वामध्ये माणूस हा विद्यार्थी आहे अन् आयुष्य ही त्याची शाळा.

 

अनुभव हे शिक्षण आणि अनुभवातून शिकत जाणं हेच उत्तीर्ण होणं अन्यथा एकाच इयत्तेत ठाण मांडून बसलेले अनेक आपण

 

पाहातोच की! एका अनुभवानंतर त्याच त्या चुका करीत नशिबाला दोष देणारे आपण पाहतोच की! आयुष्याच्या शाळेत सतत

 

नवनवीन धडे गिरविण्याची तुमची उर्मी कायम राहो आणि तुमचं वर्णनही कोणीतरी ‘मॅच्युअर्ड यंग’ अशा शब्दात करो, हीच

 

सदिच्छा!

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..