नवीन लेखन...

भूकंपरोधक वास्तूरचनेबाबत मार्गदर्शन कोठे मिळेल?

अलीकडच्या काळात भूकंप अभियांत्रिकी हा एक वेगळाच विषय अभ्यासला जात आहे. जगात अनेक विश्वविद्यालयातून भूकंप अभियांत्रिकी या विषयावर अभ्यास, प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशात अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग व मॉडेल परीक्षा केली जात आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात जगातील तज्ज्ञ आपले संशोधन सादर करीत […]

आलिया भोगासी

तर सांगत काय होतो, मध्यंतरी आमच्याकडे नेहमी झाडू पोछा करायला येणारी मुलगी, तिची तब्येत बिघडल्यामुळे यायची बंद झाली, आणि पोछाचं काम माझ्यामागे लागलं. डॉक्टरनी तिला पूर्ण विश्रांती, म्हणजे आपल्या भाषेत bed rest सांगितली होती. डॉक्टरनी सांगून त्यांचं काम केलं, पण तिला घरी बसून पोटाला कोण घालणार ? घरभाडं, मुलांची शाळा, पोटपूजा यासाठी हालचाल करणं भाग होतं. […]

संकल्प

का करतो आपण संकल्प ?केवळ नवीन वर्षात आपण काही करणार आहोत हे इतरांना सांगण्यासाठी ,दाखवण्यासाठी -की खरोखरच आपण त्यावर गंभीर विचार करून आपल्या आयुष्याला एक निश्चित दिशा देण्याचा प्रयत्न करतो-एक सुनिश्चित मार्ग आखून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करत असतो.. […]

भूकंपरोधक इमारतीच्या निर्मितीत कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे?

इमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये. अनेक वेळा असे सुटे […]

लिस बेसाक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

लिस बेसाक चा  जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली  झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते.  ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ  एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला. […]

कोकणातील पत्र(क)कारिता

कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे. […]

वूड, प्लायवूड या लाकडांच्या प्रकारात काय फरक असतो?

लाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात. १) लाकूड हा निसर्गात आढळणारा एक पदार्थ आहे. हा पदार्थ झाडापासून मिळतो. झाडांच्या फांद्या व खोड यांपासून मिळणारे लाकूड हे आदिमानवापासून आजतागायत वापरले जात आहे. झाडाच्या फांद्या, काटक्या यांचा उपयोग अग्नी निर्माण करण्यासाठी केला जात असे. पुढे वृक्षाच्या खोडापासून छोटे बुंधे बनवले जाऊ लागले. नंतर दगडाच्या […]

पैसा म्हणजे काय?

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. मूल्यमापन हे पैशाचे महत्त्वाचे कार्य आहे. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. […]

व्हिनिअर, एमडीएफ आणि मरीन प्लाय म्हणजे काय?

लाकूड निरनिराळ्या प्रकारचे असते. सागवान, ओक, आंबा, साल, देवदार आदी झाडांपासून मिळणाऱ्या लाकडात विविध गुणधर्म असतात. सागाचे लाकूड सगळ्यात मजबूत तर देवदारचे लाकूड सगळ्यात कमजोर असते. त्यामुळे ते पॅकिंगच्या खोक्यासाठी वापरतात. साहजिकच त्यांच्या किमतीही कमी जास्त असतात. म्हणून प्लायवूड बनविण्यासाठी कमी किमतीच्या लाकडाचा भुसा वापरतात, पण तो हवा आणि बाष्पामुळे लवकर खराब होऊ नये म्हणून त्यावर […]

योलन्ड बिकमन –दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

बिकमनचा जन्म पॅरिस येथे ७ जानेवारी १९११ रोजी झाला.लहानपणी त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. शाळेत शिकत असताना तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन वर प्रभुत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण झाल्यावर तिला स्विस स्कूल मध्ये धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिला वुमन एअर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.तिला तेथे रेडियो ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यात आले.कारण तिचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व होते. बिकमन १५ फेब्रुवारी १९४३ रोजी एसओई मध्ये भारती झाली.तिने सार्जंट जाप बिकमनशी १९४३ मध्ये लग्न केले. त्याच्याशी तिची प्रशिक्षणाच्या वेळी ओळख झाली. […]

1 154 155 156 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..