नवीन लेखन...

व्हिनिअर, एमडीएफ आणि मरीन प्लाय म्हणजे काय?

लाकूड निरनिराळ्या प्रकारचे असते. सागवान, ओक, आंबा, साल, देवदार आदी झाडांपासून मिळणाऱ्या लाकडात विविध गुणधर्म असतात. सागाचे लाकूड सगळ्यात मजबूत तर देवदारचे लाकूड सगळ्यात कमजोर असते. त्यामुळे ते पॅकिंगच्या खोक्यासाठी वापरतात. साहजिकच त्यांच्या किमतीही कमी जास्त असतात. म्हणून प्लायवूड बनविण्यासाठी कमी किमतीच्या लाकडाचा भुसा वापरतात, पण तो हवा आणि बाष्पामुळे लवकर खराब होऊ नये म्हणून त्यावर टिकाऊ सागापासून बनविलेले ०.२५ मिमीसारखे अत्यंत पातळ पापुद्रे ऊर्फ प्लाय फेव्हिकॉलने चिकटवले जातात. त्याला व्हिनिअर म्हणतात. हे गुळगुळीत आणि दिसायला सुबक आणि सुंदर डिझाइन्समध्ये बनविता येते. सनमायका किंवा फोरमायकाऐवजी हे वापरले जाते.

एमडीएफ हा नवीन प्रकार रेडिमेड फर्निचरसाठी वापरला जातो. हल्ली बऱ्याचशा मॉलमध्ये मलेशिया, सिंगापूर येथून आयात केलेले फर्निचर मिळते. असे फर्निचर घरी आणून नट, बोल्टने जोडून कपाटे, शोकेसेस, टी-पॉय इत्यादी वस्तू बनविता येतात. यासाठी जे बोर्ड वापरले जातात त्याला मीडियम डेन्सिटी फायबर किंवा एमडीएफ असे म्हणतात. लाकडाचा भुसा आणि डिंक (बाईंडर) एकत्र करून यंत्रामध्ये मोठ्या दाबाखाली अशा लगद्याचे बोर्ड बनविले जातात. त्यावर व्हिनिअर अथवा सनमायकाऐवजी एका विशिष्ट डिझाइनचा सिंथेटिक कागद चिकटविलेला असतो. त्यामुळे ते व्हिनिअर लावल्यासारखे किंवा सुंदर पॉलिश केल्याप्रमाणे वाटते, पण यापासून बनविलेले फर्निचर आपल्याकडच्या हवेत खराब होऊन एक-दोन वर्षांतच मोडकळीस येते.

साधे म्हणजे कमर्शियल प्लायवूड पाणी, बाष्प यांमुळे चार-पाच वर्षांत खराब होते. त्याचे पापुद्रे सुटायला लागतात. हे टाळण्यासाठी मरीन प्लाय वापरावे. साधे प्लायवूड तयार झाले की ते एका बंद पेटीत वाफेच्या दाबाखाली कॉपर क्रोमेट द्रावात बुडविल्याने प्लायवूडच्या संपूर्ण अंतरंगात जाते. बाहेर काढून सुकविल्यावर बनणाऱ्या प्लायवूडचे पाण्यापासून पूर्ण संरक्षण होते. ते कुजत नाही. आजकाल फर्निचरसाठी तर ते वापरतातच, पण मोठमोठ्या कुलिंग टॉवरसाठीही हे सर्रास वापरले जाते, कारण हे टॉवर गरम पाणी थंड करून पुन्हा वापरण्यासाठी वापरले जातात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..