नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १९)

अनेक ठिकाणी संपादक म्हणूनही मी जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे अनेक कथालेखक , व्यंगचित्रकार , व्याख्याते , कवी , या लोकांचाही परिचय झाला होता .ज्येष्ठ ख्यातनाम चित्रकार वारंगे हे पौराणिक काल्पनिक चित्रे खुपच सुंदर काढीत असत. मीही हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांचेही मला खुप मार्गदर्शन झाले , या प्रवासात खुप काही शिकलो …खुप माणसे जोडली हे मात्र खरे ..! […]

सर्वोत्तम पुरुषोत्तम!

देवाने प्रत्येक देशातील रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर देवदूत पाठविले होते.. कुठं त्या देवदूतानं, चार्ली चॅप्लीन नावाने जन्म घेतला तर महाराष्ट्रातील देवदूतानं, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाने जन्म घेतला. १९१९ साली जन्माला आलेलं हे सुदृढ बाळ तिसऱ्या वर्षांतच पाच वर्षांचं दिसत होतं. […]

3M – जपानी संकल्पना

जपान देशाने अनेक तंत्र आणि सक्सेस मंत्र साऱ्या जगाला दिले आहेत हे आपण जाणतोच. ते साऱ्या जगाला पटले आणि कौतुकास पात्र ठरले ते ह्या जपानी नागरिकांच्या उत्तरोत्तर प्रगतीने आणि सातत्याने! ह्या लेखात आपण पाहुया अशाच एका संकल्पने बद्दल. काईझेन हे एक जगप्रसिद्ध असलेले व्यवस्थापन तंत्र आहे. […]

अरे संसार संसार

आपले आयुष्य , संसार सुरु झाला की ह्या पायवाटा नि रस्ते पार एकमेकात अडकतात आणि गुंततात आणि तो गुंता इतका वाढतो की तो कोर्टाच्या दारात नेऊन ठेवतो तर कधी आत्महत्या किंवा आणखी काहीव्यसने . […]

सृजनाचा बीजांकुर

दरवळता , भक्तीभाव अंतरी.. देवत्वाचा साक्षात्कार व्हावा.. बीजांकुर , सृजनाचा रुजता.. जीवनाचा गर्भितार्थ कळावा..।।१।। शब्दांशब्दांमधुनी रंग हसावा.. श्वासाश्वासातूनी , तो गंधावा.. सुखदुःखाच्या आसवातुनही.. मंजुळ वेणूचा आनंद लुटावा..।।२।। रानफुलातुनही भ्रमर गुंतता.. मंद प्रीतीचीच झुळूक यावी.. पर्णापर्णातुनी फुटता पालवी.. मम हृदयी आत्माराम हसावा..।।३।। शब्द अबोली अन गहीवरता.. गंधचंदनी मना स्पर्शूनी जावा.. तृषार्थ व्हावे या अशा जीवनी.. आत्मरंगी आत्माराम […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ३)

१ नोव्हेंबर १९५६ ….! तत्कालीन म्हैसूर (कर्नाटक) राज्याचा स्थापना दिवस ! कन्नडीगांच्या जीवनात आनंद घेऊन आला, परंतु मराठी माणसाचा कर्दनकाळ ठरला. परकीयांची सत्ता गेली नि स्वकीयांच्या गुलामगिरीत जगण्याची वेळ ‘मराठी’वर आली. म्हैसूर राज्यात स्थापना दिवसाचा जल्लोश सुरू झाला. ऐन दिवाळीतल्या या दिवसामुळे कन्नडीगांचा आनंद व्दिगुणीत झाला. परंतु माय महाराष्ट्रापासून दूरावलेल्या मराठी माणसाच्या मनात पोरकेपणाची भावना निर्माण झाली. […]

घर ‘बसल्या’ काम !

कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी, तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या, जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर – दोन्ही ठिकाणी “आपण” असतो. घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल. […]

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

मागील भागामधून, छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती, स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न…. […]

एस टी डेपो – तुमचा माझा सर्वांचा

महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एकसारखा असतो, किंबहुना तो वेगळा  नसतोच. मोठ पटांगण. त्याच्या एकाबाजूने एसटी येण्याचा मार्ग, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो. येण्याच्या मार्गाच्या सुरवातीला उसाच गुऱ्हाळ, त्याच नाव कनिफनाथ रसवंती गृह. मालक फडतरे बंधू, मला न उलगडलेलं एक कोडं आहे की सगळ्याच उसाच्या गुऱ्हाळाची नावं कनिफनाथ व मालक फडतरे बंधू का ? […]

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर

दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. […]

1 15 16 17 18 19 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..