नवीन लेखन...

अन्नपूर्णा

जेंव्हा जेंव्हा  प्रवासाने आम्ही दोघे दमलेलो असतो …….. थकून, कंटाळून घरी येतो, झोमॅटो तिला नको असतं, म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते ! माझी आवड सांभाळून ती सांडगे पापड़ हि तळते ….. त्यासोबत  न विसरता लोणच्याची फोड वाढते कारण आम्ही दोघे दमलेले असतो तेंव्हा खरंच पिठलं भात असा साधाच बेत असतो ! कैरी लिम्बाचे लोणचे …. […]

स्वप्नविक्या- ‘थोडासा रुमानी हो जाय !’

हा चित्रपट चालला नाही, याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. नाना, विक्रम – मला वाटतं हे दोघं त्यानंतर ” नटसम्राट” चित्रपटात एकत्र आलेत. – मीही तो आजवर चित्रपटगृहात पाहिलेला नाही. खूप वर्षांपूर्वी अचानक एका रात्री डी डी चॅनेल वर लागला असताना माझ्या नशिबी चांगला योग आला. अर्थात त्याची निर्मिती दूरदर्शनची आहे आणि बहुधा सरकारी अनास्थेने त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे न झाल्याने तो वाटेतच संपला आणि प्रेक्षक एका अप्रतिम चित्रानुभवाला मुकले. […]

नामांकित संगीतकार व गायक अच्युत ठाकूर

अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. १९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती. […]

विठू ‘माउली’ च्या अंगणातील दोन अश्वत्थ – दांडेकर आणि देगलूरकर !

विठ्ठलाला आणि “माउलीं “ना अभिप्रेत असलेला वारकरी जीवनप्रवाह साक्षात जगणारे दोन कैवल्यधर्मी म्हणजे वै. मामासाहेब दांडेकर आणि वै. धुंडामहाराज देगलूरकर ! त्यांच्या उल्लेखाविना ही “वारी” कायमच अपुरी राहील. दोघेही आयुष्यभर “ज्ञानेश्वरी” जगत राहिले.एक ज्ञानमार्गाचे बोट धरून विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद सिद्ध करीत राहिला तर दुसऱ्याने भक्तिमार्ग चोखाळला. गंतव्य एकच होते आणि अंतिमतः ज्ञानेश्वरीने ते गाठायला मदत केली. […]

भज गोविन्दम् – भाग २ – चतुर्दशमंजरिका – चर्पटपंजरिका – मराठी अर्थासह

भज गोविंदम् स्तोत्राच्या या भागाला चर्पटपंजरिका असेही नाव आहे. ‘चर्पट’ चा अर्थ चिंधी किंवा लक्तर (कापडाचा तुकडा) असा आहे. आपण ब्रह्मपद रूपी शाश्वत सुखाच्या भरजरी वस्त्राऐवजी ऐहिक क्षणभंगुर सुखांच्या चिंध्यांच्या मागे लागतो आहोत अशा अर्थाने तो २२ व्या श्लोकात आला आहे.   […]

स्वरराज मदन मोहन

हा गायक -संगीतकार ओरिजिनल होता, जी एक विलक्षण आणि अविश्वसनीय बाब आहे या चित्रसृष्टीत ! भलेही इतरांनी त्याचे अनुकरण केले असो. पण हा मात्र एकांडा शिलेदार ! त्याची काही वैशिष्ट्ये ! […]

वर्ड प्रॉब्लेम्स – एक दुर्लक्षित प्रकार

गणित शिकण्या-समजण्यामधे “वर्ड प्रॉब्लेमस्” किंवा वर्णनात्मक कथन / वृत्तांत पद्धतीने मांडलेले गणिती प्रश्न हे एक महत्त्वाचा प्रकार आहे. दैनंदिन जीवन आणि शिक्षणाची सांगड घालण्यास मदत करतो. जीवनातल्या बऱ्याच प्रश्नांकडे बघण्याचा आणि ते सोडवण्याचा तर्कशुद्ध मार्ग शिकवतो. (माझ्या पाहण्यात आलेल्या परीक्षां प्रश्नपत्रिका मधे असे प्रश्न अभावानेच दिसले.) […]

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. […]

जपानी पेहराव (जपान वारी)

पारंपारिक जपानी पोशाख ज्या ठिकाणी संस्कृती जपलेली आहे अशा ठिकाणी पारंपारिक पद्धती आणि रूढी परंपरा अगदी मनापासून जपल्या जातात. पेहराव हा प्रत्येक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात पोशाखांचे अनेक प्रकार आहेत. इंडो-वेस्टर्न असा मेळ आजकाल ट्रेंडिंग असला तरी मुळ भारतीय पारंपारिक लुक ला तोड नाही! ग्लोबल होत आज जग जवळ आलंय परंतु पाश्चात्य देशातील संस्कृती […]

वसुधैव कुटुम्बकम

कुटुंब हे घरातील सदस्यांनी मिळून तयार होते. आई-वडील, काका-काकू, भाऊ, बहीण आणि आजी-आजोबा. म्हणजे एकत्र कुटुंब! आई-वडील आणि मुलगा-मुलगी हे झालं छोटं कुटुंब! आपल्याबरोबरच पशु-पक्ष्यांना देखील कुटुंबात सहभागी करुन घेतले तर त्याला आपण नक्कीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणू शकू, यात काहीएक शंका नाही… […]

1 9 10 11 12 13 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..