नवीन लेखन...

मन कि बात – तज्ज्ञ

‘तज्ज्ञ’ या कुळाबद्दल मला नितांत आदर वाटतो. मलाही त्यांच्याप्रमाणे तज्ज्ञ होता यावं यासाठी मी नेहेमी प्रयत्नशील असतो. तज्ज्ञ कसं होता येतं, हे मला फारसं कळत नसलं तरी त्यासाठी खुप म्हणजे खुपच अभ्यास करावा लागतो हे ऐकीव माहित होत. अभ्यास, तो ही साधासुधा नव्हे, तर जाड जाड ग्रंथातून, हे ही ऐकुनच माहित होतं. असं काहीबाही ऐकून माझी छाती (फक्त ३५ इंचं असलेली) दडपून जाते. […]

मन कि बात – नागडे

मित्रांनो, हा व्हिडीयो एका दिड-दोन वर्षाच्या लहान मुलाचा होता. नागड्या बाळकृष्णासारखा असलेला हा गोंद्या, स्वत:च चड्डी घालायची खटपट करत असतो. कशासाठी याची जाणीव त्याला नसली, तरी चड्डी घालायला हवी याची त्या छोट्या गोंद्याला जाणीव आहे. चड्डी घालण्याचा ते बाळ जो प्रयत्न करतं ना, ते पाहून मख्ख विद्वान चेहेऱ्यावरपण आपसूक हसू येईल. […]

सकारात्मक विचारसरणी

एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे […]

घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा…

मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा […]

भुली हुई यादों मुझे इतना ना सताओ

गाण्याचा कुठलाही प्रकार गाऊ शकणारी रफीची रेंज नाही, आवाज कसाही फिरवण्याची किशोरसारखी दैवी देणगी नाही किंवा शास्त्रीय संगीताने दिलेला मन्ना डे सारखा आत्मविश्वास नाही. सरळ सोप्प्या सुटसुटीत चाली गाणारा मुकेश तरीही प्रत्येक गानरसिकांच्या हृदयात वेगळी जागा स्थापन करून आहे. […]

प्रमुख देवस्थानांची संपत्ती

एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का? […]

भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे

थॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण मला खात्री आहे की शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. शंकर आबाजी भिसे यांना भारतीय एडिसन म्हणून सम्बोधले जाते. त्यांच्या नावावर ४० पेटन्टस आणि २०० शोध नमूद आहेत. […]

अद्वितीय, अनुकरणीय उद्योजक – श्री.सुभाष चुत्तर

१० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच. […]

एक होतं गाव

एक होतं गाव. “महाराष्ट्र” त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग. “मुंबई” त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची […]

पुण्यातल्या मेनूच्या अफलातून सूचना

मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मला मेनू विषयी माझ मत मागितल… त्यावेळी त्यांना मी दिलेले हे उत्तर… मेनू साधारण असा असावा वरण- भात, तूप, मीठ, लिंबू – त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेल खोबर आवश्यक… पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी, सुकी बटाटा भाजी, […]

1 3 4 5 6 7 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..