नवीन लेखन...

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषध काम करत नाही – भाग तीन स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा […]

खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला…. खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे […]

धन्य तो पिता

एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी […]

गीतकार आणि शायर शकील बदायूँनी

‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ […]

प्रतिभावान बासरी वादक पन्नालाल घोष

अमोल ज्योती घोष ऊर्फ पन्नालाल घोष, हे बासरी या आपल्या राष्ट्रीय वाद्याचे जनक. त्यांचा जन्म २४ जुलै १९११ रोजी झाला.भारतभर पन्नाबाबुजींचे शिष्य विखुरलेले तर आहेतच, पण रसिक तर अगणित आहेत. ज्यांनी मा.पन्नालाल घोष यांची बासरी ऐकली, प्रत्यक्ष वा ध्वनिमुद्रिकेवर, ते त्यांचे भक्त झाले. त्यांच्या बाबतीतला एक नियमच अथवा व्रतच म्हणाना : तो असा- ‘मी फक्त पन्नालाल घोषांचीच बासरी ऐकतो’. […]

धृपद-धमार गायकीतील डागर घराण्याचे उस्ताद सईदुद्दीन डागर

हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणा-या धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणा-यांमध्ये उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्म २० एप्रिल १९३९ रोजी झाला. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफलीचे राजाच असतात. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आलेला आहे. आता तो त्यांचे दोन्ही सुपुत्र उस्ताद नफिसुद्दीन […]

सायकल डे

सध्याच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमान वाढत आहे. याशिवाय वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागतो. दिल्लीमध्ये सम-विषमचा प्रयोग केला गेला. भविष्यात ही परिस्थिती आपल्याही शहरात ओढावणार आहे. हे रोखण्याकरिता सायकलिंग करणे सर्वांत चांगला व आरोग्यदायी उपाय असून, प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालविण्याचा निर्धार करावा. समाजात […]

1 7 8 9 10 11 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..