नवीन लेखन...

धृपद-धमार गायकीतील डागर घराण्याचे उस्ताद सईदुद्दीन डागर

हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणा-या धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणा-यांमध्ये उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्म २० एप्रिल १९३९ रोजी झाला. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफलीचे राजाच असतात. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आलेला आहे. आता तो त्यांचे दोन्ही सुपुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर तसेच शिष्य पुढे नेत आहेत. डागर साहेबांचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम संपन्न झाले असून धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे त्यांच कौशल्य थक्क करणारे आहे. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना मिळालेल्या पुरस्कारांची मालिकाही मोठी आहे. देशविदेशात त्यांचा शिष्यसंप्रदाय आहे. याशिवाय त्यांनी अनेक शिष्यांनाही या कठीण गायकीच्या क्षेत्रात तयार केले आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना बालगंधर्व पुरस्कार मिळला आहे. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे गायन

https://www.youtube.com/watch?v=48Bi7NqzMHo

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..