नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर

सुरेश हळदणकर यांचा जन्म १८ डिसेंबरला झाला. सुरेश हळदणकर यांचा जन्म गोमांतकातील. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत.पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, […]

सेवानिवृत्त दिवस

सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य. […]

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर

शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत. […]

अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर

बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली. […]

राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण

१९०१ आणि १९०२ मधे भरपूर ग्लायडर्स बनवल्यावर आणि त्यांची बरीच हाडतोडू चाचणी उड्डाणं केल्यावर १९०३ मधे राईट जोडगोळीनं त्यांचं पहिलं इंजिनावर चालणारं विमान ऊर्फ “पॉवर्ड एअरक्राफ्ट” बनवलं. त्याचं नाव होतं “राईट फ्लायर -१.” […]

ख्यातनाम मराठी कोशकार चिंतामणी गणेश कर्वे

‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते. […]

‘केएफसी’चे साम्राज्य उभारणारे कर्नल सँडर्स

१९६४ पर्यंत सँडर्स यांच्या ‘फ्राइड चिकन’ विक्रेत्यांच्या 600 फ्रँचायझीज होत्या. त्या वेळी त्यांनी आपली कंपनी ही 2 मिलियन डॉलर्सना विकली. जरी त्यांनी आपली कंपनी विकली तरी ते त्या कंपनीचे नेहमीच चेहरा राहिले. […]

विजय दिवस

भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरश: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले. […]

सालार जंग संग्रहालय जनतेसाठी खुले केले गेले

सालार जंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय असून केवळ एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तुंपासुन तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. सालार जंग संग्रहालयात अंदाजे ४३,००० वस्तु व ५०,००० पुस्तके आहेत. […]

भारतीय सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम (बंडोपंत देवल)

काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली. […]

1 119 120 121 122 123 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..