नवीन लेखन...

सालार जंग संग्रहालय जनतेसाठी खुले केले गेले

 

हैद्राबादमधल्या आश्चर्यांमधील एक असं हे सालार जंग वस्तूसंग्रहालय. भारतातल्या तीन राष्ट्रीय संग्रहालायांमधलं असं हे एक संग्रहालय आहे. चित्रं, शिल्पं, हस्तलिखित, मातीची भांडी, कार्पेट, घड्याळं आणि वेगवेगळ्या देशांतलं आकर्षक असं फर्निचर यांचा जगातला सर्वात मोठा संग्रह इथे पाहायला मिळतो. अनेक निजामकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ वस्तू येथे प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत.

सालार जंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय असून केवळ एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तुंपासुन तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. सालार जंग संग्रहालयात अंदाजे ४३,००० वस्तु व ५०,००० पुस्तके आहेत.

हैद्राबादच्या सातव्या निजामाचे पंतप्रधान नवाब मीर युसुफ अली खान सालार जंग (तिसरे) ह्यांनी ह्या दुर्मिळ वस्तू जमविण्यासाठी ३५ वर्षे मेहनत घेतली व त्यासाठी आपल्या मिळकतीतील मोठा हिस्सा खर्च केला.

सालार जंग संग्रहालय १९६८ साली आत्ताच्या जागेत आणले गेले. सालार जंग संग्रहालय हे पर्यटकांसाठी हैद्राबादमधलं एक विलक्षण आकर्षण आहे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 3837 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..