हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक बासू चटर्जी

सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९३० रोजी झाला. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बसस्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे ‘पिया का घर’ अगदी ‘खट्टा मिठ्ठा’ खुले. म्हणजे पुन्हा चित्रीकरणाचे दिवस ते किती? फार-फार तर पस्तीस-चाळीस. तेदेखील बातो बातो में कधी निघून जात, हे समजतही नसेल. पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. मा.हृषिकेश मुखर्जी आणि मा.बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले. बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणार्याज मध्यमवर्गीय चित्रपटाचा प्रवाह सुरू झाला. मा.राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.मा.बासु चॅटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील मानवंत निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली `नारबाची वाडी’ हा पहिला वहिला मराठी सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असं म्हणता येईल.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट



महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-1784-Yavatmal-pandulipi

यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन ...
p-2052-kapad-udyog

कापड उद्योगाचे शहर – अमळनेर

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ ...
p-1832-Gadchiroli-bambu

जंगल-डोंगरदर्‍यांच्या गडचिरोली जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा.  हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आता प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली, अहेरी व ...

p-1796-chakan-volksvogan

पुण्याजवळची उद्योगनगरी – चाकण

पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द गाव आहे. या गावाचे गेल्या काही वर्षात छोट्या शहरात रुपांतर झाले आहे.

पुणे -नाशिक मार्गावर, पुणे शहरापासून ३३ किमी वर असलेल्या  असलेल्या चाकणजवळच वेगाने ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 968 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*