नवीन लेखन...

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  […]

ठाणे जिल्ह्यातील जागृत गणेश

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला विद्याधर ठाणेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  […]

युवापिढी आणि वाचनसंस्कृती

तरूण पिढीला आपलं जीवन सुखासमाधानाचं आणि आनंदाचे व्हावे असे वाटत असेल, तर वाचनासारखा दुसरा पर्याय नाही. आज काळ बदलला आहे. बदलत्या काळाप्रमाणे अनेक सोई-सुविधा आपल्या सेवेला तत्पर आहेत. मग त्यांचा उपयोग आपल्या संपन्न, सुसंस्कृत जीवनासाठी का करायचा नाही? […]

महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ – दशा आणि दिशा

मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतिविषयी प्रेम निर्माण करणारे एक सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करणे, या अभिरुचीला वाङ्मयीन जडण-घडण करण्याचे फार मोठे सामर्थ्य वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात असते. पण सर्वच महाविद्यालयांत हे कार्य घडताना दिसत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. […]

प्रकाशन व्यवसायातील स्थित्यंतरे

पुस्तकाच्या छापील किंमतीवर ७०,८० व (खोटं वाटेल पण) ९०टक्के कमिशनचा हट्ट धरणे, स्वीकृत हस्तलिखीत प्रकाशकाडून हरवले गेल्यास, त्याचे सोयरसुतक न मानता त्याबद्दलची कसलीही भरपाई न देणे, पुस्तक प्रकाशनाचे समारंभ लेखकांला त्यांच्यश खर्चाने करायला लावून, त्याद्वारे आपल्याच प्रकाशन संस्थेची विनाखर्च जाहिरात करणे; अशा कटू अनुभवांना नवलेखकांना सध्या सामोरे जावे लागते. […]

ठाणे शहराचे स्वातंत्र्योत्तर साहित्यिक योगदान

माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत. […]

ठाणे शहराचे स्वातंत्र्यपूर्व साहित्यिक योगदान 

जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता. […]

दुर्ग-मंदिर-तलावांचे शहर – ठाणे

शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत. […]

मराठी वाड्मयातील आत्मचरित्रे

समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.

गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. […]

ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..