नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

वह सुबह कभी तो आएगी

१९५८ मध्ये साहिरने “वह सुबह कभी तो आएगी”..या चित्रपटासाठी हे गीत लिहले. मुकेशनेही आपल्या काळीज चिरत जाणाऱ्या आवाजात गायले… राजकपूरच्या डोळ्यातले हे स्वप्न आजही अनेकांच्या डोळ्यात तसेच थिजलेले आहे… […]

लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे

तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. […]

निसर्गकवी माधव केशव काटदरे

‘हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या. […]

प्रसिद्ध संगीतकार सुनिल शामराव प्रभूदेसाई

रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार आंनद उर्फ सुनिल शामराव प्रभूदेसाई यांनी संगीतातील एम.ए. पदवी प्राप्त केली होती. त्यांना संगीत तज्ज्ञ डॉ. भारती वैशंपायन व अरूण तसचे मुंबईतील डॉ. अशोक रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. याचबरोबर नाट्यसंगीत अभिनयाबाबत जयमाला शिलेदार-पुणे यांच्याकडून त्यांना धडे मिळाले होते. […]

चरित्र अभिनेता ओमप्रकाश

ओमप्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केली. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, ‘जूली’, ‘दस लाख’, ‘चुपके-चुपके’, ‘बैराग’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘प्यार किए जा’, ‘खानदान’, ‘चौकीदार’, ‘लावारिस’, ‘आंधी’, ‘लोफर’, ‘ज़ंजीर’ यांचा समावेश आहे ‘कोणीही’ वादळ ‘,’ भटक्या ‘,’ जंजीर ‘, त्यांचा ‘नौकर बीवी का’ थी हा चित्रपट होता. […]

ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन

संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला. […]

माझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर

पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली. […]

बर्डमॅन – उदय मांद्रेकर

चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो. […]

प्रेरणा

अशा अनेक व्यक्ती आहेत की, अगदी सामान्य स्थित असून, अतिशय कष्ट  व प्रयत्न करून स्वतःचा उत्कर्ष केला. अशा व्यक्ती प्रसिद्ध पराङगमुख असतात. अशाच व्यक्तीची गाथा लिहिली आहे, वाचून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे. […]

भावगीतगायक जे. एल. रानडे

‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने गायक जे. एल. रानडे हे नाव सर्वदूर पोहोचवले. स. अ. शुक्ल या कवीचे शब्द, भीमपलास रागात बांधलेली चाल आणि जे. एल. रानडे यांचा स्वर यांमुळे या गीताने जाणकारांचे चांगलेच लक्ष वेधले. गजानन वाटवे, जी. एन. जोशी व जे. एल. रानडे या तिघांच्या गाजलेल्या गाण्यांत- म्हणजे ‘रानारानात गेली बाई शीळ’, ‘वारा फोफावला’ व ‘गोड गोड ललकारी’ यांत वायु(तत्त्व) समान होते. […]

1 172 173 174 175 176 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..