कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय […]
मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर, १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे […]
काशिनाथ बोडस यांच्या घरातच गायनाची समृद्ध परंपरा होती. ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. तात्या उर्फ पं. काशिनाथ शंकर बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे गायन होते. काशीनाथ बोडस यांचे वडील पं. शंकर श्रीपाद बोडस व काका लक्ष्मणराव बोडस हे विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या […]
हिंदी चित्रपटसृष्टीत हॅपी गो लकी म्हणून ओळख असलेल्या शशी कपूर यांनी कपूर घराण्याचा कोणताही स्तोम माजवला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला. बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा. घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर […]
कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. जेष्ठ कलाकार अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक […]
जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही […]
कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला. ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली ‘एक जे अच्छे कन्या’ या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी ‘मिस्टर एंड मिसेस […]
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा […]
जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व ‘एमएस’ नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण […]
बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी […]