नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

कार्डिअॅक कॅथेटरायझेशन – डॉ. वेर्नर फोर्समान

कार्डिअॅक कॅथेटरचा मानवी शरिरावर वापर करण्‍याचे श्रेय डॉ. वेर्नर फोर्समान या जर्मन डॉक्‍टरला जाते. डॉ. फोर्समान यांनी प्रथम मानवी शरिरावर कार्डिअॅक कॅथेटर वापरून पाहिला इतकेच नव्‍हे तर एक्‍स-रे मशीन वापरून त्‍याची प्रतिमाही तयार केली. डॉ. फोर्समान यांची ही कहाणी केवळ रोचकच नव्‍हे तर एखाद्या रहस्‍यकथेप्रमाणे रोमहर्षक आहे. […]

निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक डॉ. व्हिविअन थॉमस

डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या जगप्रसिद्ध ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ ही उपचारप्रणाली विकसित करण्‍यात ज्‍यांचे मोलाचे योगदान आहे ते व्हिविअन थॉमस! थॉमस, डॉ. ब्‍लॅलॉक यांचे शल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान सहायक होते. चौतीस वर्ष डॉ. ब्‍लॅलॉक व थॉमस यांनी एकत्र काम केले. डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या कित्‍येक संशोधनांचा पाया थॉमस यांनीच रचला होता. थॉमस कृष्‍णवर्णी-आफ्रिकन वंशाचे होते. त्‍यामुळे त्‍यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असे. ब्‍लॅलॉक यांच्‍याइतकेच […]

मराठीतील प्रख्यात अभिनेते दामूअण्णा मालवणकर

नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला. दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ […]

जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट

तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला. डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले. इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्टा टोरीसेली यांनी १६४३ साली हवेचा दाब मापणाऱ्या एका साध्या यंत्राचा अर्थात वायूदाबमापकाचा शोध लावला. लवकरच असे लक्षात […]

प्रसिद्ध चित्रपट निर्माते– दिग्दर्शक मृणाल सेन

मृणाल सेन यांचे मूळ नाव माणिकबाबू; पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात. त्यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरिदपूर (बांगला देश) येथे झाला. मृणाल सेन यांच्या मातोश्री सूरजूबाला सेन स्वातंत्र्य चळवळीच्या मोठमोठय़ा सभांतून देशभक्तीपर गीत गायच्या. बिपिनचंद्र पाल यांचं त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम होतं. मृणाल सेन यांचे वडील दिनेशचंद्र सेन हे वकील होते. ते कमाईतला […]

प्रख्यात अभिनेते व विनोदवीर वसंत शिंदे

साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग […]

दत्तात्रय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी

जेष्ठ निरुपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान दत्तात्रय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. […]

मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक […]

मराठी सृष्टीतील नावाजलेले कलाकार सचिन खेडेकर

१९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे […]

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्‍ज्ञ म्‍हणून प्रसिद्ध होत्‍या. जन्‍मतःच हृदयात दोष असणार्‍या बालकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे आयुष्‍यमान उंचावणारी शल्‍यचिकित्‍साडॉ. ब्‍लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्‍वी केली व त्‍यानंतर त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले. […]

1 175 176 177 178 179 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..