गिरीश कर्नाड यांनी भारतामधील ज्या अनिष्ट राजकीय घटना झाल्या त्यांचा सतत विरोधच केला आहे. गिरीश कर्नाड हे १९७४-१९७५ मध्ये फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटचे डायरेक्टर म्हणून होते. त्याचप्रमाणे ते संगीत नाटक अकादमीचे १९८८ ते १९९३ पर्यंत चेअरमन होते तर कर्नाटक अकादमीचे अध्यक्षही होते. […]
भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे स्पेशल फायनान्सियल अँबेसेडर म्हणून अमेरिकेला पाठवले. पुढे त्यांना स्वतंत्र भारताचे तिसरे वित्तमंत्री म्ह्णून पद मिळाले ते त्यांनी जुलै १९५६ पर्यंत सांभाळले. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. […]
भालचंद्र नेमाडे म्हटले की त्यांची सर्वप्रथम कोसला ही कादंबरी समोर येते आणि त्यांनतर येते ते त्यांनी केलेले वाद-विवाद , त्यांची ‘ अनाकलनीय ‘ परंतु परखड मते. ‘ अनाकलनीय ‘ हा शब्द अशासाठी वापरला कारण अनेकांना त्याची मते पटत नाहीत , रुचत नाहीत म्ह्णून अनाकलनीय . […]
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मौज साप्ताहिक आणि सत्यकथे मधून ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ या नावाने त्यांनी लेखन केले.. त्यांचे ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ हे नाव आणि लेखन त्यावेळी खूपच गाजले. १९५१ ते १९५३ या काळात त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य होते . त्यांनी भारतीय परराष्ट्रीय हायकमिशनच्या परराष्ट्र खात्यात नोकरी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी पत्रकारितेत स्थिरावले . […]
रिमा लागू यांनी अनेक मालिकांतून कामे केली त्यात खानदान , श्रीमान श्रीमती , तूतू -मैमै , दो और दो पाच , धडकन , दो हंसो का जोडा , तुझं माझं जमेना आणि हल्ली सुरु असलेली ‘ नामकरण ‘ . रिमा लागू यांनी अनेक जाहिरातीतून देखील कामे केली . एक बुद्धीमान आणि चतुरस्त्र अभिनेत्री तर त्या होत्याच परंतु आपल्या सहकारी कलाकारांना त्या गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करायच्या , त्यांनी कधी स्वतःचा मोठेपणा मिरवला नाही. त्यांना समाजकारणाची आवड होती . […]
जवळ जवळ १७ वर्षे तो वेस्ट इंडिंजसाठी क्रिकेट खेळत होता आणि एक यष्टीरक्षक म्हणून हा कालखंड निश्चित मोठा आहे . डेरेक मरे याने ६२ कसोटी सामन्यामध्ये १९९३ धावा केल्या त्यामध्ये त्याची ११ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९१ धावा . त्याने यष्टिरक्षण करताना १८१ झेल घेतले आणि ८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे १८९ जणांना बाद केले. […]
मला आठवतंय एक चॅनेल ला वर्ल्ड कप साठी मी होतो, माझ्या नंतर त्यांचा कार्यक्रम असे, सगळे लाइव्ह असे, एक दिवशी संदीप पाटील सर येताना एक पिशवी घेऊन आले, त्यात त्यांचे काही T Shirts, टाय, कॅप आणि ब्रायन लारा याने सही केलेली बॅट माझ्यासाठी घेऊन आले, त्या वस्तूवर मी मग त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. […]
केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. […]
तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. […]