नवीन लेखन...

क्रिकेटपटू संदीप पाटील

संदीप मधुसूदन पाटील यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील मधुसूदन पाटील हे उत्तम क्रिकेटपटू होते.. त्याचप्रमाणे ते नॅशनल लेव्हलला बॅडमिंटन खेळत असत त्याप्रमाणे निष्णात टेनिस आणि फुटबॉल खेळाडू होते.

संदीप पाटील हे मुंबईला शिवाजी पार्कच्या मैदानाच्या परिसरात लहानाचे मोठे झाले. तेथे खेळाचेच वातावरण असे. संदीप पाटील यांचे बालमोहन विद्यामंदिर आणि रुईया कॉलेज मध्ये झाले. त्यांचे क्रिकेटचे कोच अंकुश ‘ अण्णा ‘ वैद्य होते. ते क्रिकेट भारतीय संघ , मुंबई आणि मध्य प्रदेशसाठी खेळले.

संदीप पाटील हे मिडीयम पेसर गोलंदाज होते. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट 1975 ते 1993 पर्यंत खेळले. ते पहिल्यांदा रणजी सामना मुंबई तीमधून 1975-76 मध्ये खेळले. परंतु पुढील तीन सीझन ते खेळू शकले नाहीत . त्यानंतर 1979 मध्ये सेमीफायनल मध्ये मुंबईकडून ते दिल्लीच्या विरुद्ध खेळले. 6 व्या क्रमांकावर खेळण्यास ते आले कारण पहिल्या चार विकेट्स मुंबईने 72 धावांमधे गमावल्या होत्या. संदीप पाटील यांनी त्यावेळी 145 धावा 276 मिनिटामध्ये 18 चौकार आणि एक षटकार यांच्या सहाय्याने केल्या. त्यावेळी त्यांच्या खेळाडू सहकार्याने 25 च्या वर धावा केलेल्या नव्हत्या.
संदीप पाटील एडमिंटन साठी मिडलसेक्स लीगसाठी 1979 आणि 1980 मध्ये खेळले होते तसेच सॉमरसेटच्या ‘ बी ‘ टीमसाठी देखील ते खेळले होते.

1979-80 मध्ये ऑस्टेलिया आणि पाकिस्तान भारतीय संघाच्या टूरवर आल्या असताना दोन्ही टीम विरुद्ध वेस्ट झोनकडून खेळताना त्यांनी 44 आणि 23 धावा ऑस्ट्रलियाविरुद्ध केल्या तर 68 आणि 71 धावा पाकिस्तानविरुद्ध केल्या . त्यामुळे निवड समितीचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीमधील सौराष्ट्र विरुद्ध वानखेडे स्टेडियम वर खेळताना खेळताना त्यांनी दुसऱ्या दिवशी लंच च्या आधी नाबाद 45 धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये 139 चेंडूंमध्ये 105 धावा केल्या आणि त्यांनी 205 चेंडूंमध्ये 210 धावा केल्या त्या 19 चौकार आणि 7 षटकरांच्या सहाय्याने.

संदीप पाटील यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना 15 जानेवारी 1980 रोजी पाकिस्तानविरुद्ध चेन्नई येथे खेळला होता. त्यावेळी त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 15 धावा केल्या त्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना फलंदाजी मिळालीच नाही कारण भारतीय संघाने तो सामना 10 विकेट्सने जिंकला होता. सिडने येथे पहिल्या कसोटी सामन्यात ते 65 धावांवर असताना टी ब्रेक च्या आधी त्यांच्या घशाला हॉगचा चेंडू लागला, तरीपण ते हेल्मेट घेतल्याशिवाय खेळत असताना परत टी ब्रेक नंतरच्या पहिल्याच षटकात लेन पास्को चा चेंडू त्यांचा कानाला लागला. ते खेळपट्टीवर कोसळले आणि रिटायर हर्ट झाले. तरीपण बरे वाटत नसताना ते दुसऱ्या इनिंगमध्ये खेळले. कारण भारतीय संघ इनींग डिफिट होऊ नये म्हणून झगडत होता. एकाच आठवड्यानंतर त्यांनी हेल्मेट घातले आणि 174 धावा अँडलेट कसोटी सामन्यात केल्या. 1981-82 मध्ये त्यांनी सहा चौकार मारले ते बॉब विलिसला एका षटकात त्यावेळी ते 9 चेंडूंमध्ये 73 धावांवरून 104 धावांपर्यंत आले. त्यावेळी त्यांनी नाबाद 129 धावा केल्या परंतु पावसामुळे त्या सामन्यावर पाणी पडले.

संदीप पाटील यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 12 डिसेंबर 1984 रोजी दिल्ली येथे खेळला. त्यांनी 29 कसोटी सामन्यात 1588 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 4 शतके आणि 7 अर्धशतके केली. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 174 धावा तसेच त्यांनाही 9 विकेटसही घेतल्या. त्यांनी 45 एकदिवसीय सामन्यात 1005 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 9 अर्धशतके केली. त्यांची एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या होती 84 धावा तसेच त्यांनाही 15 विकेट्सही घेतल्या. तसेच त्यांनी 130 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 8156 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 20 शतके आणि 46 अर्धशतके केली. तसेच त्यांनी 86 विकेट्सही घेतल्या .

निवृत्तीनंतर ते अनेक वर्षे क्रिकेट कोचिंगही करत होते तसेच त्यांनी एक हिंदी चित्रपटात देखील काम केले. परंतु आजही संदीप पाटील हे नाव घेतले तर सर्वांच्या डोळ्यासमोर एकाच गोष्ट येते ती म्हणजे त्यांनी एका षटकांमध्ये बॉब विलीसला मारलेले 6 चौकार .

मला आठवतंय एक चॅनेल ला वर्ल्ड कप साठी मी होतो, माझ्या नंतर त्यांचा कार्यक्रम असे, सगळे लाइव्ह असे, एक दिवशी संदीप पाटील सर येताना एक पिशवी घेऊन आले, त्यात त्यांचे काही T Shirts, टाय, कॅप आणि ब्रायन लारा याने सही केलेली बॅट माझ्यासाठी घेऊन आले, त्या वस्तूवर मी मग त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..