नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

रवि शंकर

सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. […]

ख्यातनाम गझल गायक गुलाम अली

गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व […]

सरोदवादक आशिष खान देबशर्मा

आशिष खान देबशर्मा हे अली अकबर खान यांचे चिरंजीव, अलाउद्दीन खान हे त्यांचे आजोबा. सरोदवादक आशिष खान देबशर्मा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३९ यांचा जन्म खाला. त्यांची मावशी, म्हणजे अन्नपूर्णादेवी. आशिष खान देबशर्मा यानी वयाच्या ५ व्या वर्षी आपल्या आजोबांच्या मार्गदर्शना खाली शिक्षण घेण्यास सुरवात केली, व पुढे अली अकबर खान यांच्या कडे तालीम घेतली. वयाच्या १३ […]

श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरे म्हणजे शब्दप्रधान स्वररचनेतील मोठे नाव. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा जन्म २७ जून रोजी झाला. श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते, […]

डॉ.लक्ष्मण देशपांडे

वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत […]

नृत्यांगना दमयंती जोशी

ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म ५ डिसेंबर १९२८ रोजी झाला. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. […]

रति अग्निहोत्री

रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा”एक दुजे के लिए’हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अभिनेत्री रति अग्निहोत्रीचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला. रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली. […]

खलनायिका, अभिनेत्री व रोल्स राइस गाडी विकत घेणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री नादिरा

खलनायिका, अभिनेत्री व रोल्स राइस गाडी विकत घेणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री नादिरा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय […]

कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश

कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय […]

बापूराव पेंढारकर

मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर, १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे […]

1 160 161 162 163 164 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..