आई जगदंबेच्या सौंदर्याचे खरे वैभव हे आहे की ते सौंदर्य पाहणाऱ्याच्या मनात वासना नव्हे तर वात्सल्य जागृत करते. पाहणाऱ्याला तापवत नाही तर त्याचा ताप दूर करते.
या वैभवाला अधोरेखित करताना , इतर वेळी मानवी भावनांना चंचल करणाऱ्या समस्त गोष्टींचे वर्णन आचार्य करीत आहेत. […]
खरे वैभव ते, जे इतरांना वैभवसंपन्न करते. खरे श्रेष्ठत्व ते जे इतरांना श्रेष्ठत्व प्रदान करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य ते जे इतरांना सौंदर्य प्रदान करते. आई जगदंबेच्या अशा सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री प्रथम तिच्या स्नानासाठी केलेल्या तयारीचे वर्णन करीत आहेत. […]
आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात, […]
हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही? […]
या श्लोकात आचार्यश्रींची प्रतिभा एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करते. आरंभीच्या तीन ओळीत भगवान शंकरांचे वर्णन आहे. हे वर्णन काहीसे नकारात्मक म्हणता येईल. मात्र त्या नकारात्मकतेच्या आधारे आचार्यश्री चौथ्या ओळीत आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत. […]