आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरीकाश्मीरत्रिपुरेश्वरी त्रिलहरी नित्याङ्कुरा शर्वरी । कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥ आदिक्षान्त – हा येथील पहिला शब्दच मोठा रमणीय आहे. आदि शब्दातही अ+ आदि असा विग्रह आहे. त्याचा अर्थ पासून सुरु होणारे. क्षान्त अर्थात क्ष पर्यन्तचे. अ पासुन क्ष पर्यंतचया सर्व वर्णांपासून निर्माण होणारे सर्व शब्द जिचेच वर्णन करतात तीआदिक्षान्तसमस्तवर्णनकरी. या मध्ये ज्ञ […]
उर्वीसर्वजनेश्वरी जयकरी माताकृपासागरीवेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी । सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥ आई जगदंबेचा वैभवाचे आणखी काही पैलू कडून दाखवताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत, उर्वीसर्वजनेश्वरी- उर्वी अर्थात पृथ्वी, त्यावरील सर्वजन अर्थात सर्वप्रकारचे लोक त्यांची ईश्वरी म्हणजे स्वामिनी. त्याचप्रमाणे सर्व म्हणजे सर्वप्रकारचे जीव. त्यांची जनेश्वरी म्हणजे उत्पन्न करणारी देवता. सोप्या शब्दात […]
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी । श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥ आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात, दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात. […]
कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करीकौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी । मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥ कैलासाचलकन्दरालयकरी- अचल म्हणजे पर्वत. तो कधीही चल म्हणजे हालचाल करत नाही. कैलासाचल म्हणजे कैलास नावाचा पर्वत. कंदर म्हणजे गुहा. आलय म्हणजे निवास. अर्थात कैलास पर्वतावरील गुहांमध्ये जी निवास करते तिला कैलासाचलकन्दरालयकरी असे म्हणतात. गौरी- रंगाने गोरी असणारी. उमा- कालिका पुराणांत उमा शब्दाचा […]
योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी । सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥ आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत. योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने […]
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरीमुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी । काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥ नानारत्नविचित्रभूषणकरी- संस्कृतचे जे शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात त्यातील एक शब्द म्हणजे विचित्र. मराठीत तो अजब , विक्षिप्त या अर्थाने वापरतात. मात्र संस्कृतमध्ये चित्र म्हणजे विविध रंगांनी आकर्षक. तर त्याला लावलेल्या विशेष या अर्थाच्या उपसर्गाने विचित्र म्हणजे विशेष आकर्षक. अत्यंत सुंदर. आई अन्नपूर्णा अशा अनेक […]
लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय? […]
सातवा श्लोक समजायला अद्वैत सिद्धान्ताची कल्पना असणं अगत्याचं आहे. अद्वैत सिद्धांत ही खरं तर वस्तुस्थिती आहे, सिद्धांत नाही; कारण त्यात सिद्ध करण्यासारखं काही नाही, फक्त जाणलं की झालं ! […]
गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची… […]
आई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत. […]