नवीन लेखन...

पांडुरंग

तुझ्या नामी
पांडुरंग
आम्ही सारे
झालो दंग।।१।।

वारकऱ्या
सवे संग
भाव भक्ती
नाही भंग।।२।।

गाती सारे
हे अभंग
हा अबीर
घे सुगंध।।४।।

नाम जप
हा व्यासंग
तुझ्या दारी
मी पासंग।।५।।

या जगतात
तू अथांग
लागे कसा
तुझा थांग।।६।।

कशी करू
सेवा सांग
नाही फिटे
तुझे पांग।।७।।

हरी हरी
हाच चंग
भक्तीला नं
चढे गंज।।८।।

भजनात
चढे रंग
दर्शनास
लावू रांग।।९।।

विठू माझा
सांगोपांग
चंद्रभागी
हे अभ्यंग।।१०।।

i

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..