नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्रीमुद्गलपुराण – १

या पुराणाचा विषय आहेत भगवान श्री गणेश. पर्यायाने अंतिम सत्य काय तर श्री गणेश. सर्वोच्च सत्ता कोणती तर भगवान श्री गणेश.अनादी,अनंत, निर्गुण, निराकार, परब्रह्म काय तर भगवान श्री गणेश. त्या भगवान श्रीगणेशांना जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण. […]

मोरया माझा – १ : पार्वतीच्या अंगावर पुतळा बनण्याइतका मळ कसा असेल?

श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल? […]

श्रीकृष्ण जन्माष्टमी-आशय व महत्व

”जन्माष्टमी”’ म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. […]

पुण्यनगरी काशी – भाग १

बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या  शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे […]

वारी पंढरपुरी

विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।। […]

पंढरपूर वारी : इतिहास, परंपरा आणि प्रवास

पंढरपूरच्या वारीची परंपरा ही सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची, पण संत ज्ञानेश्वरांनी वारीला एक धार्मिक, नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि गुरु हैबतबाबांनी (१८३२) वारीला एक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रूप दिलं.आतां आपण संतांचे सर्वसाधारण काळ पाहूं : […]

लेकुरवाळा

हि सारी संत मंडळी म्हणजे विठुरायाची लेकरे… म्हणूनच विठ्ठलाला ‘लेकुरवाळा ‘ म्हंटले असावे… जणू या सर्व संतांचे लाड कौतुक करण्यासाठी विठ्ठलाने हा अवतार घेतला असावा. […]

माझा एक अनुभव विठ्ठलाच्या वारीतला

बघा जरा विचार करुन…का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला? का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर? त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही? असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…! […]

चैतन्यमय पर्व

आषाढ लागतो ना लागतो तोच आखिल वारकरी संप्रदायात उल्हास दाटून येतो. ही सात्विक कुणकुण जणू एक वैश्विक चैतन्याचं पर्वच ठरते नी ह्या चैतन्याची खरी मुहूर्तमेढ रोवली जाते ती जेष्ठ वैद्य सप्तमी पासून सुरु होणाऱ्या वारीच्या रुपाने.वारीला किमान साडेसातशे वर्षाची परंपरा लाभलीये असे म्हणतात .ह्या वारीचं प्रस्थान होतं ते आळंदीहून. जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी अश्वारुढ होते. […]

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!

ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’ […]

1 105 106 107 108 109 150
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..