मंगलमूर्ती श्री गणेशा विषयी अमंगल गैरसमज !

कार्य कुठलेही असो, सर्वात अगोदर पूजा होते ती, मंगलमूर्ती श्री गणेशाची. मंगलमूर्ती शिवाय प्रत्येक कार्य हे अधुरेच ! अशी ही श्री गणेशाची ख्याती आहे. श्री गणेश हा मंगलमूर्ती तर आहेच, त्यासोबतच बुद्धिची देवता म्हणूनही सर्व ख्यात आहे. ऋद्धि-सिध्दि चा पती म्हणून तो प्रत्येक सांसारिक मनुष्याला प्रथम पूजनीय आहे. पण या मंगलमुर्ती विषयी मागच्या काही वर्षापासून एक गोड गैरसमज पसरला आहे. ज्याने सर्व सामान्य भाविक फार गोंधळून तर गेलाच आहे, मात्र तो कायम भितीखाली ही असतो. तो गैरसमज म्हणजे देवघरातील श्री गणेशाची मुर्ती ही डाव्या सोंडेची असावी, उजव्या सोंडेची नको.

कारण काय तर उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोहळ फार कड़क असत. त्याची रोजची पूजा सांसारिक माणसाला झेपणारी नाही. त्याची रोज षोडशोपचार पूजा करावी लागते, त्याला रोज 21 दुर्वाची जुडी अर्पण करावी लागते. त्याला रोज गाईच्या तुपात तळलेले 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा लागतो. आदि. आदि.

पण अंतिम सत्य तर हेच आहे की मंगलमूर्ती श्री गणपती कोणताही असो उजवा किंवा डावा सोंड असणारा त्याला काही नियम नाहीत. तो मंगलमूर्ती आणि विघ्नहर्ता आहे. तो अहित करतो ही भावनाच त्याच देवत्व न माननारी आहे आणि त्याच सोहळ फार कड़क असते, त्याची षोडशोपचार पूजा करावी लागते, 21 मोदक रोज लागतात या बाबी निराधार आहेत. एकीकडे देवता प्रेमळ असतात, ते नेहमी भक्तांचे कल्याण करतात, भक्तांचे असंख्य अपराध पोटात घेतात, असे सर्व शास्त्र सांगतात. आणि त्याच देवता विषयी अशा निराधार बाबी हे योग्य ही नाही. आणि शास्त्र समंत ही नाही.
अहो, आपण जिला देवता संबोधतो, जिचे असामान्यत्व मान्य करतो. जिच्या शक्ति स्वरूपाची भक्ति करतो. जिला अनन्यभावाने शरण जातो. त्याच देवते विषयी असे निर्रथक भ्रम निर्माण करतो. ही बाब किती लज्जास्पद आहे.

देवता कोणतीही असो, तिने कसे असावे ? तिने कसे बसावे ? असे नियम त्या देवतेला लावणे म्हणजे तिचं देवत्वच नाकारण्यासारखे आहे. तिच्या स्वरूपाचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणजे हे कस झालयं, आम्ही राजाकडे दान मागायला त्याच्या दारात तर जाणार. पण तो राजा आम्हाला दान देण्यासाठी कसा बसला पाहिजे, त्याने कोणते वस्त्र धारण केले पाहिजे, तो कसा असला पाहिजे. हे मात्र आम्हीच ठरवणार……?

अरे हे काय चाललंय तो राजा आहे की आमचा घरगडी ? त्याला असले नियम लावायला ! अशाने तो दान देईल का ? नाहीच देणार..!  मग देवतेला असे क्षुल्लक नियम लावून काय साध्य होणार ? देवता या प्रेमळ असतात, म्हणून त्यांना याचे काहीच वाटनार नाही. तुम्ही उजव्या सोंडेचा पूजा अथवा डाव्या सोंडेचा पूजा किंवा कुठलाच पूजू नका. याने त्या मंगलमुर्तीला काहीच फरक पडणार नाही. तो तर फक्त भावाचा भुकेला आहे. भाव भक्ति शिवाय त्याला बाकी काहीच महत्वपूर्ण नाही. म्हणून हे सर्व भ्रम निर्रथक आहेत.

दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात गणपतीची पूजा करणारा गाणपत्य नावाचा पंथ आहे, ज्यांची संख्या 10 कोटीच्या घरात आहे, ते लोक गणेशाला परब्रह्म व सर्व देवतांचा पूज्य मानतात, त्यांच्या पंथात दोन्ही सोंडेचा गणेश सारखाच आहे. ते दोन्ही गणेशाचे मनोभावे पूजन करतात. त्यांच कधीच काही अहित होत नाही. महाराष्ट्रात सुद्धा दाते पंचाग स्वतः उजव्या सोंडेचा गणेश पूजते आणि दाते पंचाग वरचा उजवा सोंडेचा गणपती पूजनारे व सुखी समाधानी असणारे लाखो लोक महाराष्ट्रात आहेत. त्यांच ही कधी काही अहित झालेलं नाही. (उलट दाते पंचाग ने सुद्धा आपल्या धर्म शास्त्रीय निर्णय भाग 01 पान क्रमांक 12 या ग्रंथात खुलासा करुण असे स्पष्ट केले आहे कि उजव्या सोंडेचा गणपती पूजन करू नये ही बाब खोटी व शास्त्र विरुद्ध आहे.)

तसेच मी स्वतः गणेश पुराण, धर्मसिन्धु, निर्णयसिन्धु, मनुस्मृति हे सर्व ग्रंथ वाचलेले आहेत, हे सर्व ग्रंथ माझ्या संग्रही सुद्धा आहेत, यापैकी कोणत्याही ग्रंथात गणेशाच्या सोंडेचा भेद नाही. किंवा डावा गणपती पूजावा व उजवा पूजू नये याबद्दल एक ही अक्षर लिहिलेले नाही. त्यामुळे हे अंतिम सत्य आहे की वरील बाब चूकीची व अंधश्रद्धा आहे. त्यामुळे कुठल्याही सोंडेचा गणपती देवपूजेत ठेवा. त्याची मनोभावे भक्ति करा. तो निश्चितच तुमचे कल्याण करेल…!

अहो तो प्रत्यक्ष विघ्नहर्ता आहे. मग त्याच्यात पूजेच्या बाबतीत असे विघ्न का निर्माण करता ? तो मंगलमुर्ती श्री गणेश ठरवेल ना त्याला कोणीकडे सोंड करुन बसायचे आहे ते….!

तुम्ही त्याचा विचार करू नका………..!!!

— सुनिल कनले  

सुनिल कनले
About सुनिल कनले 14 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…