नवीन लेखन...

मित्र व मैत्री

मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल. आपण पौराणिक कालखंड विचारात घेतला तर आपल्याला सर्वप्रथम श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री पहावयास मिळते वास्तविक दोघांची मैत्री होण्यासारखे काहीच साधर्म्य नाही. श्रीकृष्ण हे एक क्षत्रिय राजकुमार तर सुदामा हा एक सर्वसामान्य ब्राह्मण. दोघांच्या आर्थिक परीस्थीतीत जमीन अस्मानाचे अंतर पण मैत्रीत हे सर्व गौण होते व म्हणुनच मैत्री म्हणताच आपल्या नजरेसमोर पहिले ऊदाहरण श्रीकृष्ण व सुदामा यांचेच येते.

महाभारतातील मैत्रीचे दुसरे मोठे ऊदाहरण म्हणून आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजे दुर्योधन व कर्ण. एक राजकुमार तर दुसरा एक सामान्य सुतपुत्र. पण एकदा मित्र मानल्यावर ती मैत्री दोघांनी शेवटपर्यंत निभावली. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा केले तर कर्णाला शेवटी आपण जेष्ठ पांडव असल्याचे समजून सुध्दा त्याने शेवटपर्यंत मैत्री निभावतात प्रत्यक्ष आपल्या भावाशी युध्द करूनमैत्री साठी आपले प्राण अर्पण केले.

आपल्या धर्मग्रंथात व ईतीहासात अशी अनेक ऊदाहरणे आपल्याला आढळून येतील. व त्यातील प्रत्येक मैत्रीचे वेगवेगळे कंगोरे आपणास दिसून येतील. वरील महाभारतातील दोन ऊदाहरणे मैत्रीच्या ऊच्चतम पातळीवरील असली तरीही त्या मैत्रीची परीणीती भिन्न प्रकारे झाल्याचे आढळते कारण त्या मैत्रीतील भावना वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री ही भक्तीच्या स्वरूपातील होती त्यामुळे सुदमाचा भाग्योदय झाला तर दुर्योधन व कर्ण यांची मैत्री ही ऊपकाराच्या ओझ्याखाली दबलेली होती. त्यामुळे त्याची परीणीती ही दोघांच्या विनाशात झाली.

वरील दोन ऊदाहरणे ही प्रातिनिधिक आहेत. प्रत्यक्ष जिवनामधे आपणास मैत्रीचे विविध अविष्कार पहावयास मिळतात. व त्यांच्या स्वरूपानुसार ढोबळ मानाने पुढील विविध प्रकार आढळून येतात.

बालमैत्री:

लहानपणी साधारण वय वर्षे १२ पर्यंतच्या मैत्रीस बालमैत्री असे म्हणता येईल. मैत्रीच्या विविध स्वरुपा पैकी ही मैत्री ही खरी निरपेक्ष मैत्री म्हणता येईल. येथे उच्च निच, गरीब श्रीमंत, जात, धर्म या कशाचाही विचार नसतो म्हणुनच अशी मैत्री ही कायम स्वरूपात राहणारी अशी असते. कालौघात जरी नोकरी व्यवसायामुळे भेट झाली नाही तरी ती मैत्री मनाच्या एका गाभाऱ्यात अबाधित असते. त्यामुळे जेव्हां कधी बालपणीचा आपला मित्र अचानक बरेच वर्षानंतर भेटतो तेव्हा दोघांना झालेला आनंद केवळ अवर्णनीय असतो.

युववस्थेतील मैत्री:

ही मैत्री साधारणपणे वयाच्या १८ वर्षानंतर महाविद्यालयीन जिवनात निर्माण होते. मात्र ही बहुधा एका विशिष्ट निकषांवर झाल्याचे आढळून येते. ज्यांची आवड एक आहे, सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विचारसरणी एक सारखी आहे अशा तरुणांची पटकन मैत्री होते. महविद्यालयातुन बाहेर पडल्यानंतर यातील एखाद्याचीच मैत्री पुढे टिकून रहाते.

व्यवसाईक मैत्री:

एका  समान व्यवसायातील व्यक्ती विविध व्यवसाईक कारणांमुळे वेळोवेळी एकत्र येत असतात. त्यावेळी व्यवसायातील विविध प्रश्नांचा विचार होत असतो. यावेळी काही सम व्यवसाईकांची एकमेकांशी विषेश जवळीक निर्माण होते, मैत्री होते व काही जणांच्या बाबतीत कौटुंबीक स्नेह संबंध निर्माण होतात. व काही वेळा असे स्नेह संबंध नात्यात परावर्तीत होतात.

कार्यालयीन मैत्री:

आपल्या पैकी बरेच जण नोकरी करत असतात. नोकरीत असताना आपला आपल्या सहकरी बंधुबरोबर वेळोवेळी संबंध येत असतो. एकमेकांना मदत करणे अडी अडचणीत धाऊन जाणे यामुळे कौटुंबीक स्नेहसंबंध निर्माण होताना दिसतात. मात्र या मैत्रीतील फार कमी संबंध हे कायम स्वरुपी टिकून रहातात. बरेच वेळा ही मैत्री ही तात्कालिक स्वरुपाची असते.नोकरीत बदली झाल्यावर किंवा निव्रूत्त झाल्यावर बहुधा हे मैत्री संबंध हळूहळू कमी होत जातात. फारच कमी लोकांच्या बाबतीत अशी मैत्री पुढे टिकून रहाते व ज्याची मैत्री नोकरीतील बदली किंवा निव्रूत्त नंतरही पुढे टिकून रहाते असे लोक खरोखरच भाग्यवान म्हणले पाहीजेत.

 

मैत्री ही कोणत्याही प्रकारची असली तरी जिवनात मैत्री असणे हे फार महत्त्वाचे आहे. काही वेळा सुखदु:खाच्या काही घटना आपण आपल्या नात्यातील व्यक्ती बरोबर व्यक्त करु शकत नाही अशा वेळी मित्र ऊपयोगी पडतो व आपण आपल्या जिवनातील सुखदुःखे ही मित्रांसोबत व्यक्त करु शकतो. आपल्या एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगी खरा मित्र आपल्या पाठीशी आधार बनुन उभा रहातो. तसेच जर आपण कोठे चुकत असलो तर तो अधिकार वाणीने आपली चुक दाखवून देऊन ती सुधारण्यासाठी मदत करतो. म्हणुन जिवनामधे एक तरी खराखुरा मित्र असावा कि जो आपल्या चांगल्या दिवसात तर साथ देईलच पण आपल्या कठीण प्रसंगात तो आपल्या पाठीशी खंबीरपणे ऊभा राहून आपला  आधार बनेल व आपले संपूर्ण जीवन आनंदमय करेल. 

— सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा
१० जुलै २०१७

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..