नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री व्यंकटेश स्तोत्र , कृपा प्रसाद आणि मी

तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो . […]

स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश

अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही. […]

छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष वध आणि नववर्ष शोभा यात्रा ?

आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही . […]

या देवी सर्व भूतेषु

आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत . […]

श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे. […]

माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सव 

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! […]

धनुर्धारी एकलव्य

धन्य तो एकलव्य,  जीवन ज्याचे दिव्य इतिहास घडवी भव्य,  कौरव पांडवा संगे  ।।१।। साधा होता भिल्ल,  शरीर संपदा मल्ल धनुर्विदेचे शल्य,  त्याच्या अंगी होते ।।२।। जन्मता धनुर्धारी, बनोनी शिकारी हिंस्र जनावरे मारी,  अचूक नेम मारूनी ।।३।। पाहोनी भक्ष्य,  होवूनी दक्ष देवूनी लक्ष, शिकार करी ।।४।। गुरूच्या होता शोधात,  तीच त्याची खंत पूर्णता नसे ज्ञानात,  गुरूविना ।।५।। […]

मारुती स्तोत्रचा मराठीत अर्थ

मारुतिस्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि करावी अशी शिकवण दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत. […]

महाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय

श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]

दानशूर कर्ण

महाभारतातील कर्णाचे स्थान   अद्विती असून मान जाई उंचावुनी    त्यास समजोनी घेता   ।।१।। सुर्यपुत्र कर्ण    घनुर्धारी महान दानशूर तो असून   इतिहास घडविला   ।।२।। सुर्य आशिर्वादे जन्मला  कवच कुंडले लाभती त्याला रक्षण वलय शरिराला   मिळती कर्णाच्या   ।।३।। अंगातील कर्तृत्व शक्ति    माणसाला उंचावती शक्तीस वाट फुटती    शोधूनी त्याची योग्यता   ।।४।। जन्मुनी प्रथम पांडव    सहवासांत सारे कौरव हेच त्याचे खरे […]

1 106 107 108 109 110 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..