जीवन आणि यश

जीवन जगण्याच्या दोन पद्धती असतात एक स्व इच्छेने आणि दुसरे प्रकृती अनुसार. जे पहिले जीवन आहे ते आपण सद्या जगत आहोत. पण असे ही एक वेगळं जीवन आहे, ते थोडं भिन्न व नैसर्गिक जे प्रकृती अनुसार असते. या सृष्टी मध्ये , या निसर्गा मध्ये जी ती गोष्ट, ज्या त्या रूपाने योग्य आहे. त्यामध्ये हस्तक्षेप जो होतो तो मानवाचा आणि त्यातून होणारे परिणाम व अनुभव हेच ते सुख व दुख असतात .मनुष्य स्व इच्छेने जगतो मग इच्छा अनुसार झाले की सुख आणि इच्छा अपूर्ण असल्याचे दुख. या इच्छा पूर्ण करण्याची जी धडपड असते त्याला struggle म्हटले जाते. आणि ते सारे successful होण्यासाठी.

मग  What is Success? यश म्हणजे नेमके काय असतं ? जर असे विचारले तर ; या आशा प्रश्नाची उत्तरे अनेक मिळतील पण सर्वांमध्ये एकच तथ्य असेल ते म्हणजे completeness and satisfaction/ परिपूर्णता आणि समाधान. जसे –  जीवन जगण्याचा एक उद्देश असतो तो उद्देश पूर्ण झाला की आपण successful असे म्हणतो, आणि छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण होऊन शेवटी जे समाधान मिळते त्याला ही success म्हणतात .

अधिक जन असा विचार करतात की, ‘मला हे हवे आहे! , ते हवे आहे! ‘हा विचार त्या गोष्टी बद्दल असतो ज्या त्यांच्याकडे नसतात. ते आहे त्या गोष्टी बद्दल विचार करत नाहीत . सर्वांच्याच इच्छा पूर्ण होत नसतात . स्वप्न पूर्ण करू शकलो नाही म्हणून निराश होण्याचा काही संबंध नाही कारण किती ही जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले, तरी ही यश येत नसल्याचे कारण; म्हणजे प्रकृतीच्या मुळाशी सत्य नसेल तर यश येत नाही. हे जीवन नैसर्गिक नियम अनुसार चालते. ते आपल्या अनुसार चालावे असा समज ठेवणे चुकीचे नाही का? मला असे म्हणायचे नाही की, अपयशात समाधान माना . मी म्हणत आहे, यश हवे असेल तर ते मिळवण अवघड व सोपे नसते . हे फक्त अनुभवी ज्ञान असते. जे तथ्य असते ते म्हणजे योग्य दिशेने प्रयत्न करणे. चुकीच्या दिशेने किती ही चालत राहले तरी पोहचता येत नाही. ते असे होईल जसे गोलाकार दिशेने किती ही फिरले तरी, फिरून-फिरून तिथेच यावे लागते. एखादी परिस्थिती पुन्हा-पुन्हा येत असेल उदाहरण काही विद्यार्थी सारखे नापास होतात. तर अशा वेळी त्या परिस्थितीला टाळून न जाता त्यावर मात करणं गरजेचे असते पण ती परिस्थिती तो पर्यंत असते, जो पर्यंत आपण योग्य ती शिकवण शिकत नाही. म्हणजे हे “व्यक्तिचे जीवन एक पुस्तक आहे, प्रत्येक घटना म्हणजे त्या पुस्तकाचे एक पृष्ठ असते आणि त्या व्यक्तीचे हाव भाव , वाणी व behaviour हे त्या पुस्तकाचे cover page असते”     ते वाचायला शिकले पाहिजे. जसे पश्य: ताप काय असतो ते शब्दात समजते पण उमजत नाही. त्याचा खरा अर्थ हा त्याला माहीत ज्याने तो अनुभवला आहे. मग अनेक पृष्ठ मिळून एक पुस्तक बनते अर्थात आयुष्य मग “जीवनातील प्रत्येक घटना अनिवार्य आहे”. म्हणून अपयश आल्यावर निराश होणे चुकीचे आहे. कारण प्रवास करताना रस्ता चुकल्यावर कोणी दुख करत नाही . मग हे लक्षात ठेवावे की जीवन सुधा एक प्रवास आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही एका  train मध्ये बसला आहात ती train तिकडे जाणार नाही जिथे तुम्हाला जायचे आहे. तुमची  किती ही इच्छा असो व प्रयत्न ते शक्य नाही. त्यासाठी योग्य train पकडणे हेच निश्चित असते आणि यश मिळवण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे जे हवे त्यासाठी आपला अधिक वेळ गुंतवणे .

काही वेळा आपण त्या गोष्टींच्या अपेक्षा करतो  ज्या इतरांकडे असतात मग अशा ही काही गोष्टी असतात ज्या फक्त तुमच्याकडे असतात. म्हणजे प्रत्येकाचे जीवन हे वेगळे व एकमेव असते मग तुलना करून जगू नये हे जीवन नैसर्गिक असते या मध्ये सुख व दुख फक्त मनाच्या अवस्था आहेत. जे घडते ते सारे प्रकृती अनुसार.

प्राणी हे प्रकृती अनुसार जगतात. एखाद्या प्राण्याला त्याच्या जीवनामध्ये काय घडाव व काय नको या बाबत पर्याय नसतात जे आहे ते स्वीकारव लागत . जसे वाघ म्हणत नाही की मी आज मांसाहार सोडून शाकाहार खाणार , गाय म्हणत नाही की मालक मारतो म्हणून मी दूध देणार नाही. त्यांना मारलं तरी ते सहन करतात .पण उलट मारण्याचा विचार त्यांच्या मनात येत नाही. इथे विचार म्हणजे भाषा नव्हे विचारांचे स्वरूप हे चित्र रूपामधे असते. मग प्राणी ही विचार करतात पण त्यांची मर्यादा असते, एक इच्छा भूक लागली मग काय खावं याची अपेक्षा नसते तर तेच खाणार त्यांचा कडे पर्याय नसतात ,फक्त भूक मिटावी इतकच.

मनुष्य हा स्व;इच्छेने जगतो अगदी ठरवून जसे – काही जन  वेळ पाहून जेवण करतात. एकाच वेळी सर्वांना भूक लागत नाही, तरी ही ते जाणवत नाही. जेवणा पूर्वी थोडासा विचार करायला हवा, की खरोखरच भूक लागली आहे! झोपे बद्दल सुधा वेळ पाहून आपण अंथरुण करतो. व जबरदस्ती पडून राहतो मग, कधी झोप येते कळतच नाही. एखादा पाणी पित असेल तर तहान नसताना सुधा आपण पण पितो . अशा या गोष्टी आपण वारंवार करतो. एका विशिष्ट वेळेत मग अशा गोष्टींना सवय म्हणावे लागेल . आपले जीवन सवयी अनुसार चालले आहे . पण सवय म्हणजे जीवन नव्हे, फक्त सुख आणि दुख म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जगण्यातील जिवंतपणा आणि तो आज नाहीसा झालेला दिसतो. जे खरे जीवन आहे ते प्रकृतीचे व वास्तवातले आणि खोटे ते कल्पनेतले मग जरा विचार करूया या जीवनामध्ये जगण्या इतके आपले आयुष्य असते तरी किती ? मग आपण जीवन जगत तर आहोत मात्र त्यामधे जिवंतपणा राहलेला नाही. तर तो हवा असेल तर वर्तमानकाळात जगायला शिकले पाहिजे. पण बहुतेक जन हे वर्तमानाशी समाधान नसतात. तरुण असताना त्यांना वाटते भविष्य सुंदर असेल. मग आहे तो वेळ वाया घाल वून आशेवर ते जगतात. पण त्यांनी आपल्या पेक्षा प्रौढ व वयस्क लोकांना थोडे प्रश्न विचारल्यावर त्यांना उत्तर मिळेल” पूर्वी सारखे आताचे जीवन राहले नाही”. एकूण अर्थ असा की मनुष्य वर्तमानाशी समाधान नाही. वर्तमानात वाटते, भविष्य सुंदर असेल पण ते भविष्य कधी येत नाही आणि जे येते, ते भविष्यात आल्यावर म्हणायचे भूतकाळ फार सुंदर होता. खूप वेळ व्यर्थ ठरतो, जे मिळते ते फार थोडेच असते. पहा कसे ते समजा जर जीवनामध्य साठ वर्ष धरले तर वीस वर्ष झोपण्यात गेले, दहा वर्ष बालपण , दहा वर्ष career साठी, शेवटचे दहा वृद्ध अवस्थेत पश्य ताप करत बसण्यात. राहले दहा, व्यर्थ गोष्टी व मूर्खपणा जाणे केवळ वेळ वाया जातो अशा गोष्टी साठी पाच वर्ष. राहले पाच मग इतकेच असते जे जगायला मिळते. म्हणून थोडा वेळ स्वत:साठी द्यायला हवा प्रत्येक दिवस शेवटचा दिवस म्हणून जगा. कोणतीही गोष्ट भविष्यावर टाकू  नका, जे करायचे ते आज करा भूतकाळ कधी परत येत नसतो आणि भविष्यकाळ अस्तित्वात नसतो.  जे असते ते फक्त वर्तमान. जगायचे तर आज जगायचे, मुक्तपणे ,अगदी हवे तसे मग कधी एकदा असे ही जगून पहा मग ते जीवन एक दिवसाचे का होईना – आपल्याला जे Feel होतं ते करणं. जसे सहजच एका अनोळखी रस्त्यावरून चालत जायाचं कोठे माहीत नाही , कोणत्याही बस मध्ये, कोणत्याही ठिकाणी ,समुद्राच्या दिशेने , जंगलाच्या दिशेने , भव्य इमारतीने भरलेल्या एका शहराच्या दिशेने , कधी जहाजे मध्ये बसायचे तर कधी विमानात , कधी scooter वर तर कधी SUV car मध्ये , कधी चालत तर कधी टांग्यात किंवा बैलगाडीत , कधी एका झोपडीत राहायचे तर कधी luxury हॉटेल मध्ये , कोणत्याही ठिकाणी पण लोभ नको , वासना नको , भेद नको जे हवे ते फक्त मुक्त जीवन अगदी एक तासाचे असो की एक दिवसाचे , कोणत्याही वेळी ,कधी इथे तर, कधी तेथे पण चालत रहायचे , कोठे थांबावस वाटते तिथेच थांबायचे. कारण असो व नसो वाटलं म्हणून केलं ,अचानक आज सुट्टी घेतली हमेशा कारण पाहून घेता आज अगदी सहजच , स्वत:साठी जगायचे . एखाद्या  सुंदर वस्तु कडे किंवा व्यक्ति कडे मन भरून पाहणे पण कशाचीही अपेक्षा न करता. पहावास वाटलं म्हणून पहिले , sugar आहे पण तरीही एकदा चहा घेतला. अर्थात मृत्यू ला न घाबरता ,जीवनामध्ये कोणतेही बंधन न ठेवता, स्वातंत्र्यपूर्ण, ना भूत काल ना भविष्य, फक्त वर्तमानात मुक्तपणे जगणे एक तास का होईना पण मुक्त जीवन असेल तर जगण्यातील जिवंतपणा जाणवेल. अर्थात जे होतं ते होऊ देणे स्व: ता कडून व निसर्गाकडून . असे जीवन जंगने प्रकृतीचे जीवन होय .

— करण कांबळे 

About करण कांबळे 10 Articles
Articles of the author are publishing from magazines and newspapers. Right now he is writing a mysterious novel and will soon be published.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…