नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

कागदासाठीचा लगदा

पाण्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘लगदा’ होय. कागद तयार करण्याच्या पद्धतीत लगदा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लगदा हा मुख्यतः तीन प्रकारचा असतो. लगद्याच्या पहिल्या प्रकारात लाकडाच्या भुश्यामधे फक्त पाणी घालून तो तयार करतात. लाकडातील लिग्निन, हेमीसेल्यूलोजसारखे नैसर्गिक पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ लगद्यातून काढून टाकले जात नाहीत तसेच कोणतेही रासायनिक पदार्थ […]

केरोसिन इंधन

ही १८६० सुमारातील गोष्ट आहे. त्या वेळी, पेट्रोलियम खनिज तेलाचा शोध’ नुकताच लागला, होता. पण, माणसाला त्याचा फारसा उपयोग नव्हता. तेव्हा युरोपमध्ये लोक प्रकाश मिळविण्यासाठी दिव्यामध्ये व्हेल माशाचे तेल वापरीत. ते खूप खर्चिक असे. त्याच वेळी खनिजतेलातून केरोसिन म्हणजे घासलेट तेलाचे उत्पादन सुरू झाले. अगदी दुसऱ्या वर्षापासून त्याची जगात इतरत्र निर्यात सुरू झाली. आपल्या भारत देशात […]

व्हॅक्यूम क्लिनर

धूळ हा आजच्या काळात एक डोकेदुखीचा मुद्दा होऊन बसला आहे, धुळीमुळे आपल्याला श्वसनाचे आजार जडतात त्यामुळे त्यापासून रक्षण करणे गरजेचे असते. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही नाजूक असतात ती धुळीमुळे खराब होतात अशा ठिकाणीही व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला जातो. […]

ग्रीज आणि भेद्यक्षमता

फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing the palm (मस्का लावणे) अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणदेखील आहे. ग्रीज हे पेट्रोलियम बेस ऑइल (प्राथमिक स्वरूपाचे, निर्वात उर्ध्वपातनानेn मिळालेले वंगणतेल) आणि विविध प्रकारचे साबण यांचे मिश्रण होय. हे साबण गरजेनुसार कॅल्शियम, लिथियम, सोडियम, बेरियम, ॲल्युमिनियम, […]

आश्चर्यकारक मिश्रधातू

अतिथंड तापमानाला धातूंचे आणि मिश्रधातूंचे गुणधर्म बदलतात. सर्वसाधारण तापमानाला अतिशय उपयुक्त ठरणारा एखादा धातू वा मिश्रधातू हा अतिथंड तापमानात ठिसूळ बनतो व निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अतिथंड तापमानाला वापरायच्या धातू व मिश्रधातूंवर मर्यादा येते. परंतु हा प्रश्न कदाचित नजीकच्या भविष्यात सुटण्याची शक्यता आहे. […]

शीतलक व ब्रेकतेले.

एका पेट्रोलियम कंपनीच्या गोदामाला अचानक आग लागली. सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यतत्पर असलेल्या तिथल्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण कळेना. त्या दुर्घटनेची ‘रुट कॉज अॅनालिसिस’ करण्यात आली. अखेरीस त्यांना ते कारण सापडले. त्या गोदामात पोटॅशियम परमॅग्नेट या रसायनाच्या गोणी साठवून ठेवल्या होत्या. त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या कक्षात शीतलकाची पिंपे उभी केलेली होती. शीतलक हे मुख्यतः एथिलिन ग्लायकोल या रसायनाने बनलेले […]

थर्मास फ्लास्क

थर्मास फ्लास्क म्हणजेच व्हॅक्यूम फ्लास्कचा उपयोग आपल्याला कुठल्याही द्रवाचे तपमान आहे ते राखले जाते. थंड पेय त्यात ठेवले तर थंड राहते गरम ठेवले तर गरम राहते. […]

व्हाइट स्पिरिट

मिनरल टर्पेन्टाइन हे ‘व्हाइट स्पिरिट’ (स्वच्छ, पारदर्शक द्रावण) वर्गातले द्रावण असून ते १४५ ते २०५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळते. रंग, वार्निश, लेकर्स यांचे पृष्ठीय थर (सरफेस कोटिंग) देण्यासाठी हे द्रावण मोठ्या प्रमाणात वापरतात. या द्रावणात असलेल्या एरोमेटिक हायड्रोकार्बन्सच्या अंशामुळे त्याची द्रावणीयता वाढीव स्वरूपाची असते. त्याची ही द्रावणीयता व हळुवार उडून जाण्याची क्षमता यांच्या समतोलपणामुळे समप्रमाणात कोटिंग करताना खूप फायदा होतो. […]

सुरुवातीचे प्लास्टिक – कचकडे

१९५० पर्यंत घराघरात तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. पितळेच्या भांड्यात ठेवलेल्या आंबट पदार्थांची चव बदलते त्याला कळकणे म्हणतात. त्यासाठी ‘भांड्यांना आतून कल्हई केली जाई. कल्हई करणे म्हणजे कथलाचा (टिन) मुलामा देणे. १९५० च्या सुमारास बाजारात स्टेनलेस स्टीलची भांडी नुकतीच डोकावू लागली होती. साधारण त्याच सुमारास बाजारात प्रथम कचकड्याच्या वस्तू दिसू लागल्या. या वस्तू टेबलावरून खाली जमिनीवर पडल्या तर पिचत किंवा फुटत. कचकड्याच्या निमित्ताने प्लास्टिकची ही पहिली ओळख भारतीय समाजाला झाली. […]

हिरवं ग्रीनलँड…

ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. […]

1 30 31 32 33 34 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..