नवीन लेखन...

शीतलक व ब्रेकतेले.

एका पेट्रोलियम कंपनीच्या गोदामाला अचानक आग लागली. सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यतत्पर असलेल्या तिथल्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण कळेना. त्या दुर्घटनेची ‘रुट कॉज अॅनालिसिस’ करण्यात आली. अखेरीस त्यांना ते कारण सापडले. त्या गोदामात पोटॅशियम परमॅग्नेट या रसायनाच्या गोणी साठवून ठेवल्या होत्या. त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या कक्षात शीतलकाची पिंपे उभी केलेली होती. शीतलक हे मुख्यतः एथिलिन ग्लायकोल या रसायनाने बनलेले असते. जमिनीवर ठेवलेल्या एका पिंपातून शीतलकाची गळती झाली होती. ते जमिनीवरून घरंगळत झिरपत, पोटॅशियम परमॅग्नेटच्या संपर्कात आले होते त्या ‘उष्मादायी’ वेळी (एक्झोथर्मिक) प्रक्रिया घडून उष्णता वातावरणात मुक्त होऊन ज्वाला निर्माण झाल्या आणि गोदामाला आग लागली. गाडीच्या तापलेल्या रेडियटर यंत्रणेला थंडाव देण्याचे कार्य करणारे शीतलक (कूलंट) आणि गाडीच्या ब्रेकला कार्यतत्पर ठेवणारे ब्रेकफ्लुईड दोन्ही वंगणे प्रत्यक्ष पेट्रोलियम खनिज तेलापासून तयार होत नसतात; म्हणूनच त्यांना ‘स्पेशॅलिटी ऑइल्स’ म्हणतात. या दोन्हींचा मुख्य घटक ‘एथलिन ग्लायकॉल’ हे रसायन असते. या रसायनात योग्य ती रासायनिक पूरके टाकून त्यांची गुणवत्ता वाढविली जाते.

रेडियटरमध्ये घातले जाणारे शीतलक हिवाळ्यात गोठत नाही की उन्हाळ्यात उकळत नाही. वातानुकूलित कार गाड्यांसाठी ते खूप उपयुक्त ठरते. वातानुकूलित यंत्रणा गंजू नये, तिथले रबर व प्लास्टिकचे भाग सुरक्षित राहावेत यासाठी हे शीतलक महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असते. या शीतलकांच्या विविध कार्यांमुळे त्यांस ‘अॅण्टी फ्रीझ ॲण्ड कूलंट’ (ए.एफ. अॅण्ड सी.) असे संबोधिले जाते. महामार्गावर ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ अशी घोषणा सर्रासपणे आपल्या नजरेस पडते, पण भरधाव चालणाऱ्या गाडीचा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. अचानक पुढे आलेल्या अडथळ्यावर गाडीच्या वेगाला आवर घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हा ‘थांबक’ (ब्रेक) करीत असतो. त्याची देखभाल व डागडुजी वेळोवेळी व्हायला हवी. त्यासाठी ग्लायकोलयुक्त रसायन कामी येते. ब्रेक दाबला की निर्माण होणाऱ्या उष्णतेला हे रसायन शोषून घेते व त्याच्या नाजूक भागाचे रक्षण करते. थांबकाचे घन प्रदूषणापासून रक्षण करण्याचे कार्यदेखील हे द्रव करीत असते.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..