नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

ढाई अच्छर प्रेम का.. (प्रास्ताविक : ‘प्रीतिगंध’ काव्यसंग्रहाचें)

शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची […]

गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी `सेबी’

सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात “सेबी (SEBI)” ही भारतातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध मार्ग वापरते. सामान्य गुंतवणूकदारांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार करण्यासाठी “सेबी”ने जुन २०११ मध्ये एका वेबसाईटची निर्मिती केली. scores.gov.in या संकेतस्थळावर आता कोणताही सामान्य गुंतवणूकदार आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करु शकतो. गुंतवणूकदारांकडून […]

रसास्वाद : ‘आर्यमा’ काव्यसंग्रहाचा

‘आर्यमा’ हा, श्रीमती चंद्रलेखा बेलसरे यांच्या कवितांचा संग्रह आहे. तो वाचल्यानंतर, त्यावर, एक रसिक वाचक म्हणून, कांहीं लिहावें, असा विचार केल्यामुळे, हा लेख. अर्थात्, त्या अनुषंगानें मनांत आलेल्या कांहीं गोष्टींचाही येथें ऊहापोह केलेला आहे . (सहज, जातां जातां म्हणून सांगतो, चंद्रलेखा बेलसरे या, ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या उपसंपादक आहेत). प्रस्तुतचा मजकूर म्हणजे स्व-संवादच आहे म्हणा ना ! […]

काव्यसुमनांजली – म्हणजेच अपेक्षा वाढविणार्‍या कविता

एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला […]

आयुष्य – एक वाचनिय कवितासंग्रह

डॉ. शांताराम कारंडे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘आयुष्य’ हा कवितासंग्रह वाचला, या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर असललेली डॉ. शांताराम कारंडे यांच्या चेहर्याडची फुसटशी प्रतिमा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सांगते तर चहाचे दोन भरलेले ग्लास आणि एक रिकामा ग्लास हे सांगतो की दोन ग्लासातील थोडा थोडा चहा तिसर्यात ग्लासात ओतला की तीन कटींग चहा तयार होतात त्या कटींगच्या माध्यमातून […]

मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

चला तर मग यापुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीतच इ-मेल लिहिण्याचा, पत्रव्यवहार करण्याचा आणि फेसबुकवरही मराठीत लिहिण्याचा संकल्प करुया. किमान दहा मेल्सपैकी एक आणि फेसबुकवरच्या दहा पोस्टपैकी एक एवढं तर आपल्या मायबोलीसाठी आपण करु शकतो ना?
[…]

इ-पुस्तक – आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे गेली अनेक वर्षे “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर नियमितपणे लेखन करत आहेत. हे लेख अल्पावधीतच आमच्या हजारो वाचकांच्या पसंतीला उतरले असून अतिशय लोकप्रिय झाले आहेत. इ-पुस्तक फक्त रु. १००/- “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा […]

वंश आणि अंश: एक समाज प्रबोधनपर लघुनाटिका

लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात. परंतु लेखकाने अनुभवलेल्या एका प्रसंगांमध्ये स्त्रीचे मत स्पष्टपणे आणि योग्य ठिकाणी मांडणे कितपत आवश्यक आहे याची सर्वांना नक्कीच कल्पना येईल. आजच्या या २१व्या युगातील महिलांमधील शारीरिक, […]

बांगलादेशी घुसखोरी – भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका

१९४४ सालचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेलनी आपल्या ‘व्हॉइसराईज जरनल’ या पुस्तकामध्ये लिहिले होते की “आसामचे मुख्यमंत्री मोहम्मद सदाउल्ला खान हे मोठय़ा प्रमाणात बंगालींची घुसखोरी आसाममध्ये करण्याचा आणि पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत होते”. वायव्य भारतात मुस्लिमबहुसंख्य राज्य असावे ही कल्पना मुस्लिम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी १९३० मध्ये मांडली. जानेवारी १९४० पासून जिना ह्यांनी हिंदू […]

1 19 20 21 22 23 34
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..