नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

गाथा स्त्री शक्तीची

स्त्रीची ताकद तिच्या आत्मिक बळांत आहे. आत्मबळाचा शोध तिनं एकदा घेतला की मग ती कोणाचीच राहात नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितींना सामावून घेत ती आयुष्याला नवं परिमाण देते. असंच आयुष्याला परिमाण देणार्‍या १३ स्त्रियांच्या अफाट कर्तृत्त्वाचा पट या पुस्तकाच्या रुपाने पुढे येत आहे. महिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या सर्व नाटकांमध्ये एक सृजनशील […]

घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !

स्त्रीयांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात.         घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय ! लेखिका : सौ. विजया किशोर भुलेस्कर प्रकाशक : मोनिका प्रकाशन, नाशिक मूल्य […]

नुस्तं हसू नका !

विनोदी लेखाबरोबरच सामाजिक वर्तनाची खिल्ली उडवणारे लेख आहेत. काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज परता अडकलेला आहे आणि पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. देशात नवनवीन मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी या कार्यास योगदान देत आहे. मंदिर बांधण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकरणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून […]

श्र्वास आणि इतर कथा

‘श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्र्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्र्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची. श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह. श्र्वास आणि इतर कथा लेखिका : माधवी घारपुरे प्रकाशक : अनघा प्रकाशन, […]

फिल्मी चक्कर – सिनेसृष्टीत मारलेला फेरफटका

मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारंच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न सफल झाला आहे. मोठे आर्टिस्ट असले तरी ते त्यांच्या सहवासातील छोट्या लोकांशी कसे मोठेपणा झुगारुन वागत याची खूप उदाहरणे पुस्तकात मिळतील.         फिल्मी चक्कर लेखक : रमेश उदारे प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व मूल्य : १३०/- […]

गर्भगिरीतील नाथपंथ

नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.   हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्‍या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ […]

हिमशिखरांच्या सहवासात

लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं […]

राजा थिबा

मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी ‘थिबा पॅलेस’ […]

नाही म्हणजे नाही !

पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा […]

भारताची राष्ट्रीय प्रतीके

‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील […]

1 18 19 20 21 22 34
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..