अजूनही जगावेसे वाटते
भाळीचे सुखदुःख,ओंजळीत ओसंडले तरीही, आज स्वच्छंदी जगावेसे वाटते थकली गात्रे, निमाल्याही आशाकांक्षा तरीही सुखानंदे, मस्त जगावेसे वाटते सरता दिनराती, अंतरी आंस उद्याची उगवता, पुन्हा नि:शंक जगावेसे वाटते ऋतुचक्रांचे, अविरत अस्तित्व चराचरी विनाआसक्त, कृतार्थी जगावेसे वाटते हे माझे ते माझे, सोडुनीया स्वार्थ सारे जगती, मुक्त, निर्मोही जगावेसे वाटते न कुणी कुणाचे, भास सर्वत्र मृगजळी हाच सत्यार्थ ! […]
