क्षणभंगुर जीवन
कधी उमजणार तुला मनुजा क्षणक्षण सरतो जीव आपुला जीव हा क्षणभंगुर, अशाश्वत क्षणाचाही नाही इथे भरवसां ||१|| तरी मुक्तनिर्बंधी जगतो आपण भौतिक सुखात, बेधुंद अविरत परिणामाचीही, न करता चिंता अविचारी, हा विनाशी भरवसां ||२|| जे जे पेरावे, ते ते इथेच उगवते जे जसे करावे तसेच इथे भरावे हीच तर असते, नियतीची रीती समजुनिया मनुजा वाग जरासा […]
