कावळा
तो असतो बसलेला नेहमी कुणाच्या- ग्रिलच्या दांडीवर कर्कश्श ओरडत, एखाद्या भिकाऱ्यासारखा पोटाला मागत. पितृपक्ष वजा केला तर – त्याला फक्त झिडकारणीच मिळते. गरिबाला कुठे असते आवड निवड ? त्याच्या नशिबी नेहमीच हड हड. तसं बिचाऱ्याला काहीही चालते , पाव ,गाठ्या,शेवापासून उकिरड्यापर्यंत- नकारघंटा अगदी कशालाच नसते. नाक मुरडणं, तोंड फिरवणं काही नाही, कौतुकाने त्याला काहीच ठेवत नाही […]
